
राजमाता जिजाऊ नवीन बसचा लोकार्पण सोहळा तळोदा बस स्थानकात उत्साहात…
तळोदा तालुक्यासाठी नवीन पाच बस लोकार्पण आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते संपन्न…
तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धुळे विभाग अंतर्गत अक्कलकुवा आगारात तळोदा बस स्थानकासाठी राजमाता जिजाऊ नवीन पाच बसेस दाखल झाल्यात. या पाचही बसचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला.

शहादा तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी व माजी नगराध्यक्ष अजय परदेशी पोलिस निरीक्षक राजन मोरे यांच्या हस्ते बसचे पूजन, फित कापून उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी आमदार राजेश पाडवी म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांच्या नावाने दाखल झालेल्या नवीन बसेस सर्व सुविधायुक्त असून तालुक्यातील प्रवाशांचा सेवेसाठी उपलब्ध झाल्या आहेत प्रवाशांनी या बसमधून प्रवास करण्याचे आवाहन केले.

काही दिवसां पूर्वी आमदार राजेश पाडवी यांनी अक्कलकुवा आगाराअंतर्गत तळोदा बस स्थानकासाठी राजमाता जिजाऊ बस उपलब्ध होणे बाबत मागणी केली होती. अखेर या मागणीला यश आले.
राजमाता जिजाऊ नवीन बस लोकार्पण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नगरसेवक शिरीष माळी, प्रा विलास डामरे, योगेश मराठे, श्याम राजपूत, आगार व्यवस्थापक किशोर अहिरराव, वाहतूक निरीक्षक अजिंक्य नाटकर, प्रकाश वळवी, नारायण ठाकरे, दारा वसावे किरण सूर्यवंशी, आकाश वळवी डॉ. पुंडलिक राजपूत नवनाथ ठाकरे, रमेश पाटील सुभाष शिंदे, दीपक कलाल, अंबालाल साठे,उपस्थित होते.

कार्यक्रमाचे अक्कलकुवा आगाराचे सहा कार्यशाळा अधीक्षक भरत पवार, शरद वसावे, प्रशासन लिपिक गणेश मराठे , कामगार संघटना सचिव शकील पिंजारी, कामगार संघटना अध्यक्ष मनोज खैरनार वाहतूक नियंत्रक संदीप जावरे, मनोज भारती, दीपक पाडवी, रवींद्र पाडवी, टी एस बाविस्कर, भागवत वसावे, लिपिक चालक व्ही जीं राठोड, एस एम पाटील,व
चालक वाहक आणि कार्य शाळा कर्मचारी यांनी परिश्रम घेतले,
बसमधून फेरफटका मारण्याचा मान्यवरांनी घेतला आनंद…
लोकार्पण सोहळ्या नंतर आमदार राजेश पाडवी आणि सर्व मान्यवरांनी कर्मचाऱ्यांनी नवीन बस मधून प्रमुख मार्गावरून फेरफटका मारत प्रवासाचा आनंद घेतला
- 0
- 0
- 0
- 0





