नंदुरबार

महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या नंदुरबार तालुका अध्यक्षपदी अरुण साळुंखे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या नंदुरबार तालुका अध्यक्षपदी अरुण साळुंखे यांची नियुक्ती

नंदुरबार / सप्त नगरी न्यूज ब्युरो- महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने सामाजिक कार्याची दखल घेत संघटनेची महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

संघटनेचे संस्थापक अध्यक्ष  प्रवीण समाधान भोटकर साहेब यांच्या आदेशानुसार व प्रदेश उपाध्यक्ष सुरज एस. यादव यांच्या नियुक्तीपत्रानुसार, तळोदा, नंदुरबार येथील सामाजिक कार्यकर्ते अरुण शांतिलाल साळुंखे यांची महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या नंदुरबार तालुका अध्यक्ष_ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्तीपत्रानुसार, साळुंखे यांनी संघटनेची शिस्त, नियम व उद्दिष्टांचे पालन करत निष्ठेने कार्य करावे. तसेच गरजू रुग्ण आणि श्रमिक कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासन, पोलिस, आरोग्य अधिकारी व डॉक्टर वर्ग यांच्याशी समन्वय साधून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका बजावी, अशी अपेक्षा संघटने व्यक्त केली आहे.

_”आता रुग्णसेवक संघटना प्रत्येक रुग्णाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. रुग्णसेवेत हलगर्जीपणा व भ्रष्टाचार खपवून घेतला जाणार नाही”_ असे यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरज एस. यादव यांनी सांगितले.

रुग्णसेवा, सामाजिक बांधिलकी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अधिक प्रभावीपणे कार्य करण्याच्या उद्देशाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली असल्याचे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

नियुक्तीनंतर साळुंखे यांचे विविध सामाजिक, राजकीय व रुग्णसेवा क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे जिल्ह्यातील रुग्णसेवा व कामगारांच्या प्रश्नांना अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

_अरुण साळुंखे, नंदुरबार_

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *