शेजवा शाळेत वनविभागा अंतर्गत सीड बाॅल चे प्रात्यक्षिके
नंदुरबार सप्त नगरी न्यूज ब्युरो –
नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत नंदुरबार सामाजिक वनीकरण विभागा अंतर्गत सीड बॉल चे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.

सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते यावेळी सामाजिक वनीकरण विभाग नंदुरबारच्या वनपाल श्रीमती आरती नगराळे यांनी आपल्या परिसरामध्ये वृक्षांची लागवड कशी करावी व रोप कशी तयार करायची,या संदर्भात शाळेत सर्व विद्यार्थींना आपल्याच परिसरातील माती व बी च्या माध्यमातून सीड बाॅल कसे तयार करायचे व ते तयार केल्यावर सूकवन डोंगराळ भागात किंवा ओसाड जागेत पाऊस पडल्यानंतर कसे ठेवायचे याचे प्रात्यक्षिक करून दाखवले यावेळी सामाजिक वनीकरण विभाग नंदुरबारच्या वनपाल श्रीमती सोनल बोरसे श्रीमती सुनंदा विंदे ह्याही उपस्थित होत्या.
या सीड बॉल बनवण्याच्या प्रात्याक्षिके मध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदवला. यावेळी अध्यक्ष भाषणातून मुख्याध्यापक दत्तू पाटील यांनी दिवसेंदिवस निसर्गाचा होत असलेला बदल व त्यांचे परिणाम तसेच पर्यावरणाचे बिघडत चाललेले संतुलन जर का व्यवस्थित राखायचं असेल तर आपल्याला आपल्या परिसरामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड कशी होईल व ते त्यांचे संवर्धन कसे करावे या विषयीचे सविस्तर असे मार्गदर्शन केले तर शाळेचे उपशिक्षक विजय पवार यांनी आज वृक्षांची फार गरज आहे पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात करावी लागेल याविषयी सविस्तर माहिती दिली
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले तर आभारप्रदर्शन हारूणखाॅं शिकलीगर यांनी मानले सदरील कार्यक्रमाला शाळेचे उपशिक्षक दिपक वळवी ,रामानंद बागले ,संजय बोरसे संदीप गायकवाड, श्रीमती संगीता गोखले यादी उपस्थित होते. सदरील कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिपाई दिनेश पवार यांनी परिश्रम घेतले.यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सीड बाॅल तयार करण्याचा व त्यांना लावण्याचा संकल्प घेतला.
- 0
- 0
- 0
- 0






