धुळे

जन भागीदारी अभियान अंतर्गतच्याशिबिरात नागरिकांनी सहभागी व्हावे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते धुळे जिल्ह्यात जन भागीदारी अभियानास प्रारंभ

जन भागीदारी अभियान अंतर्गतच्या
शिबिरात नागरिकांनी सहभागी व्हावे

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते

धुळे जिल्ह्यात जन भागीदारी अभियानास प्रारंभ

धुळे, दि. १८ (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM JANMAN) आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत (DA-JGUA) जन भागीदारी अभियानाची जिल्ह्यात सुरुवात झाली असून या अभियानांतर्गत होणाऱ्या शिबिरांचा संबंधितांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी केले.

जिल्ह्यात आजपासून ते २५ मे २०२६ पर्यंत “जन भागीदारी – सर्वात दूर, सर्वात पहिले” देशव्यापी जनजागृती (IEC) अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी असलेल्या कल्याणकारी योजनांचा १०० टक्के लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत येणाऱ्या 213 गावांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियानाचे आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते उदघाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रकल्प अधिकारी- प्रमोद पाटील सहायक प्रकल्प अधिकारी- पवन सोनूने आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या जनजातीय कार्य मंत्रालय आणि राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील अनुसूचित जमाती आणि प्रामुख्याने अतिदुर्गम भागातील आदिवासी बांधवांसाठी “जन भागीदारी – सर्वात दूर, सर्वात पहिले” हे विशेष देशव्यापी आयईसी (IEC) अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 213 गावांमध्ये विविध लोककल्याणकारी योजनांची जनजागृती आणि ‘लाभार्थी संतृप्ती शिबिरांचे’ (Beneficiary Saturation Camps) आयोजन करण्यात येईल. या अभियानाचा मुख्य उद्देश प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान (PM JANMAN) आणि धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान (DA-JGUA) अंतर्गत समाविष्ट असलेल्या गावांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा १०० टक्के लाभ (Saturation) पोहोचविणे हा आहे. हे संपूर्ण अभियान ‘अभिसरण मॉडेल’वर (Convergence Model) आधारित असून सर्व संबंधित अंमलबजावणी यंत्रणांच्या समन्वयाने राबविण्यात येणार आहे.

गाव पातळीवरील उपक्रम (१९ ते २५ मे): गावोगावी दैनंदिन स्वरूपात शासकीय योजनांचे फॉर्म भरणे, कागदपत्रांची पूर्तता करणे आणि आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित केली जातील.
व्हिलेज इमर्जन्सन ड्राईव्ह (२० मे): शासकीय अधिकारी, स्वयंसेवी संस्था (NGOs) आणि ‘आदि कर्मयोगी’ गावांमध्ये पदयात्रा (Transect Walks) काढून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करतील आणि जनजागृती करतील. आदिवासी सेवा केंद्रांवर ‘जनसुनावणी’ (२१ ते २३ मे): या कालावधीत ‘जनसुनावणी’चे (Jan Sunwai) आयोजन करून नागरिकांच्या तक्रारी व समस्या नोंदवल्या जातील आणि प्रलंबित हक्कांचे जागेवरच निवारण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
आरोग्य व पोषण तपासणी: शिबिरांमध्ये प्रामुख्याने आरोग्य तपासणी, सिकलसेल (Sickle Cell) जनजागृती, पोषण आणि प्रतिबंधात्मक आरोग्य संदेशांवर विशेष भर दिला जाईल.
यशोगाथांचे संकलन: आदिवासी तरुण, महिला उद्योजक आणि ‘धन विकास केंद्र’ (VDVKs) यांच्या उपजीविके संदर्भातील यशोगाथांचे दस्तऐवजीकरण करून त्यांना बाजारपेठ जोडणी मिळवून दिली जाईल.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *