धुळे शहरात परिवर्तन, प्रगती आणि विकासाची लाट,भाजपला वाढता पाठिंबा – मंत्री जयकुमार रावल

धूळे / सप्त नगरी न्युज ब्युरो
धुळे शहरात सध्या परिवर्तन, प्रगती आणि विकासाची जोरदार लाट पाहायला मिळत आहे. आज नामांकन अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून दुपारी ३ वाजेपर्यंत चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. ही परिस्थिती भाजपसाठी अत्यंत अनुकूल असून दोंडाईचा पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात आणि शहरात प्रभावीपणे कार्यरत असल्याचे चित्र आहे.
राज्यभरात विकासाचा एक सशक्त मॉडेल उभा राहिलेला असून, त्याला नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. भारतीय जनता पार्टीच्या तिकिटासाठी धुळ्यात तब्बल 450 इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. मात्र पक्षाच्या धोरणानुसार केवळ 63 उमेदवारांना तिकीट देण्यात आले. यामुळे काही इच्छुकांमध्ये नाराजी दिसून आली आणि त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले.
मात्र आज नामांकन माघारीच्या दिवशी अनेक इच्छुकांनी शांतपणे विचार करून आपण भाजपाचेच कार्यकर्ते असल्याची भूमिका घेतली असून, पक्षाच्या हितासाठी नामांकन अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. विरोधी पक्षांनी भाजपच्या सेकंड, थर्ड आणि फोर्थ क्रमांकातील काही इच्छुकांना ए-बी फॉर्म देऊन उमेदवारी दिल्याचेही समोर आले आहे.
भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सांगत आहेत की, आम्ही लोकशाहीवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारधारेवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या संकल्पनेवर विश्वास ठेवतो. त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता, पक्षाच्या निर्णयाला मान देत नामांकन अर्ज मागे घेण्यात येत आहेत.
दरम्यान, काही उमेदवारांना दूरच्या गावात किंवा इतर शहरांत नेऊन एका ठिकाणी ठेवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. अशा प्रकारे कोणावरही दबाव टाकू नये, त्यांना मुक्तपणे निर्णय घेऊ द्यावा, अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. लोकशाही मार्गाने निवडणूक लढवायची असल्यास जनतेचा कौल स्वीकारावा, अन्यथा स्वेच्छेने नामांकन अर्ज मागे घ्यावा, असे आवाहनही मंत्री जयकुमार रावल यांनी केले करण्यात आले आहे.
- 0
- 0
- 0
- 0





