नंदुरबार

जेष्ठांची सेवा हीच ईश्वर सेवा! धानोरा येथे ‘राष्ट्रीय वयोश्री योजने’तून जेष्ठांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; आमदार राजेश पाडवी यांचा मार्गदर्शनाखाली शुभम चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम

जेष्ठांची सेवा हीच ईश्वर सेवा! धानोरा येथे ‘राष्ट्रीय वयोश्री योजने’तून जेष्ठांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप; आमदार राजेश पाडवी यांचा मार्गदर्शनाखाली शुभम चौधरी यांचा स्तुत्य उपक्रम


तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो
भारतीय संस्कृतीत जेष्ठांना देवाचे स्थान दिले गेले आहे. त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन समाजाला नेहमीच दिशा देणारे असतात. याच भावनेतून आणि ‘जेष्ठांचा सन्मान, आमचा अभिमान’ हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून, तळोदा तालुक्यातील धानोरा येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

               ‘आरोग्य दूत’ म्हणून ओळख निर्माण केलेले आमदार राजेश पाडवी यांच्या विशेष प्रयत्नातून आणि केंद्र सरकारच्या ‘राष्ट्रीय वयोश्री योजना’ व ‘पंतप्रधान दिव्यांग केंद्र’ यांच्या संयुक्त विद्यमाने ६० वर्षांवरील जेष्ठ नागरिकांना आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

            तळोदा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक आणि सिद्धिविनायक एस. बी. ग्रुप ऑफ बिझनेसचे संस्थापक अध्यक्ष संजीव  चौधरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
          

                यावेळी मार्गदर्शन करताना आमदार राजेश पाडवी यांनी यारसंगी म्हणाले की, “केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांसाठी आणि विशेषतः जेष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी अनेक जनकल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. या योजना केवळ कागदावर न राहता त्या गरजूंपर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे. आज धानोरा येथे जेष्ठांना चालण्यासाठी काठ्या, व्हीलचेअर आणि इतर आरोग्यविषयक साहित्याचे वाटप करून त्यांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.”
  

               यावेळी कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री उमेश सोनवणे, माजी दोडे गुजर समाज उपाध्यक्ष रघुवीर चौधरी, दोडे गुजर समाज तळोदा उपाध्यक्ष गोविंद पाटील, गावचे पोलीस पाटील सुधाकर पाटील, सरपंच श्रीमती सुनीता ठाकरे,  दशरथ ठाकरे, कढेलचे सरपंच  संजय वळवी, अरुण गिरासे, विजय सिंग गिरासे, छोटा धनपुर येथील मगन वळवी, योगेश पाडवी यांच्यासह परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
                   कार्यक्रमाची सुरुवात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शुभम संजीव चौधरी यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून योजनेची सविस्तर माहिती दिली आणि या शिबिरामागची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय कलाल यांनी केले.
                   कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आणि प्रत्येक लाभार्थीला साहित्याचे व्यवस्थित वाटप करण्यासाठी गावातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये जितेंद्र पाटील, भूषण पाटील, उमेश पाटील, विवेक चौधरी, वैभव चौधरी, अतुल पाटील, समर्थ पाटील, प्रदीप चित्ते, अनिल वळवी आणि यश चव्हाण यांनी मोलाची कामगिरी बजावली.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *