नंदुरबार

पक्ष संघटना अधिक मजबूत करावी : माजी आमदार शिरीष चौधरी. शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक संपन्न

पक्ष संघटना अधिक मजबूत करावी : माजी आमदार शिरीष चौधरी.

शिवसेना शिंदे गटाची आढावा बैठक संपन्न

तळोदा | सप्त नगरी न्यूज ब्युरो:-

शिवसेना पक्ष हा गोरगरीब, सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारा पक्ष आहे. शिवसेनेने नंदुरबार जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये प्रचंड यश मिळवले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेऊन पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्ष कार्य करावे. युवक आणि महिलांचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन माजी आमदार शिरीष चौधरी यांनी केले.

शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार शिरीष चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीस जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, तालुकाप्रमुख अनुपकुमार उदासी, नंदुरबार लोकसभा युवा सेना उपाध्यक्ष संदीप परदेशी, नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, नगरसेवक नदीम बागवान, उपजिल्हाप्रमुख डॉ. पेंढारकर, शहादा तालुकाप्रमुख मनलेश जयस्वाल, युवासेना उपजिल्हा प्रमुख राजरत्न बिरारे, माजी सरपंच प्रवीण वळवी, ग्रामपंचायत सदस्य दत्तू ठाकरे, मयूर पाटील, जितू गुरव, चंद्रकांत पाटील, इम्रान सिकलीकर आदींसह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवसेनेच्या शहरातील व तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विविध समस्या जाणून घेत त्यावर चर्चा करण्यात आली. पक्ष संघटना वाढीसाठी काय केले पाहिजे यावर मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी कार्यकारिणी, एस.आय.आर तसेच बी.एल.ए व नेमणुकीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *