
रांझणी परिसरात कापूस लागवडीस प्रारंभ
तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपूर ,रोझवा पुनर्वसनसह परिसरात खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक कापूस लागवडीस प्रारंभ झाला असून परिसरात ऊन सावली काहीशी मृगछाया राहत असल्याने कापूस लागवडीचा निर्णय घेतला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
कापूस हे प्रमुख्याने उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात घेतले जाणारे पीक असून याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून शेतजमीन खोल नांगरटी करून तवा मारून सरी बनवून तयार करण्यात आली होती. त्यात हेक्टरी पाच ते दहा टन चांगले कुजलेले शेणखत पसरण्यात आले आहे. शेतकरीकडून सध्या पाच बाय दोन तसेच सहा बाय दोन फुटाच्या अंतरावर कापूस बियाण्याची लागवड केली जात असून लगेच कापसाला पाणी देण्यात येत आहे.
कापूस लागवडीमुळे परिसरात चांगलाच रोजगार उपलब्ध होत असून यंदा पाऊस लवकर होईल असा शेतकऱ्यांकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
- 0
- 0
- 0
- 0





