धुळे

टंचाई निवारणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे जिल्ह्यातील टंचाई व चारा टंचाईच्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी घेतला आढावा

टंचाई निवारणासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

जिल्ह्यातील टंचाई व चारा टंचाईच्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी घेतला आढावा

धुळे, दि. 10 मार्च,  (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यात संभाव्य पाणी टंचाई व जनावरांसाठी चारा टंचाईच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात सातपुडा सभागृहात पाणी टंचाई व चारा टंचाई बाबत आढावा बैठक आज झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, कार्यक्रारी अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जयश्री सार्वे, कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग, धुळे देवेंद्र अग्रवाल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.गिरीष पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मनिष पवार उपस्थित होते.

जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते म्हणाल्या की, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी संबंधित विभागांनी आवश्यक ती पूर्वतयारी करावी. संभाव्य टंचाईग्रस्त गावांची माहिती अद्ययावत ठेवून आवश्यकता भासल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था तातडीने सुरू करावी. तसेच जनावरांसाठी चाऱ्याचा पुरेसा साठा उपलब्ध राहील यासाठी नियोजन करावे. चारा टंचाई भासणाऱ्या भागांची माहिती वेळेवर सादर करावी. टंचाई परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना व शेतकऱ्यांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. पवार यांनी सांगितले की, ज्या तहसिल कार्यालयाकडे विहीर अधिग्रहणांचा तसेच टॅकरद्वारे पाणी पुरवठाचा प्रस्ताव आला असेल त्यांनी त्यास त्वरीत मंजुरी द्यावी. पाणी टंचाई बाबत लोकप्रतिनिधीसोबत तालुका पाणी टंचाई बाबत बैठका घ्याव्यात.

बैठकीत जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची स्थिती, संभाव्य टंचाईग्रस्त गावे, टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची तयारी, विहिरी व बोअरवेलची स्थिती, तसेच जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, पाणीपुरवठा विभाग, कृषी विभाग व महसूल विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *