नंदुरबार

शेजवा  माध्यमिक शाळेत महिला दिवस साजरा

शेजवा माध्यमिक शाळेत महिला दिवस साजरा

नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो: नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत 8 मार्च जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती संगीता गोखले या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील, आशा वर्कर यशोदा वसावे, सुजाता पाडवी, अनिता पाडवी, सविता वसावे यादी उपस्थित होते.

                    कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती माता,राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी लक्ष्मीबाई होळकर, इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी अध्यक्ष भाषणातून श्रीमती गोखले यांनी जागतिक महिला दिवसाविषयी माहिती देताना पूर्वीच्या स्त्रिया व आजची स्त्रिया यांच्यातील बदल, स्त्रियांना मिळणारे हक्क, समानता याविषयी सविस्तर माहिती दिली. तर प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक पाटील यांनी 8 मार्च जागतिक महिला दिवस व त्याचे महत्त्व स्त्रियांना दिलेले गेलेले हक्क याविषयी मनोगत व्यक्त केले.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे उपशिक्षक विजय पवार यांनी केले. यावेळी शाळेचे विद्यार्थी संजीवनी पाडवी, यशराज वळवी शाळेचे उपशिक्षक हारूणखाॅं शिकलीगर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले तर आभार संजय बोरसे यांनी मानले. सदरील कार्यक्रमाला शाळेचे उपशिक्षक दिपक वळवी , शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिपाई संजय वसावे दिनेश पवार यांनी परिश्रम घेतले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *