सोलापूर

सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार दिन उत्साहात साजरा


🔸
वैद्य, नल्लामंदू , मठपती , सोनावणे यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे ” आदर्श पत्रकार पुरस्कार कुलकर्णी , पाटील , शेख , गोसावी , यांना सन्मान पूर्वक प्रदान

शब्दांचा वापर जपून करावे
डॉ शिंदे

सोलापूर / सप्त नगरी न्युज ब्युरो

सोलापूर जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आले. सर्व प्रथम दर्पणकार जांभेकर व कै रंगा अण्णा वैद्य यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले. पुरस्कार निवड समितीचे अय्यूब अहमद यांनी उर्दू शायरी सह सर्वांचे स्वागत केले सचिव. प्रा पीपी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करत पत्रकार संघाचे अहवाल सादर केले अध्यक्ष अशोक मठपती व सहसचिव अबुबकर नल्लामंदू यांनी सर्व मान्यवरांना शाल बुके व स्मृति चिन्ह देवून सत्कार केले

या नंतर संचारकार स्व रंगा अण्णा वैद्य यांच्या स्मरणार्थ दै . सुराज्यचे उपसंपादक पुरुषोत्त कुलकर्णी यांना तर . ‘कासिदकार ‘ स्व . अ. लतीफ नल्लामंदू यांचे नावे असलेला पुरस्कार दै लोकमतचे उपसंपादक अप्पा पाटीक यांना , बार्शीचे ज्येष्ठ संपादक स्व बाबुराव मठपती यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र टाईम्स ऑन लाईनचे वार्ताहर इरफान शेख यांना तर स्व . मारुती सोनावणे यांच्या स्मरणार्थ दै संचारच्या माढा प्रतिनिधी व ज्येष्ठ पत्रकार दिलीप गोसावी
यांना सर्व मान्यवरांचा शुभ हस्ते जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के , पुअ होळकर विद्यापीठचे रजिष्ट्रार डॉ शिवाजी शिंदे व निवड समितीचे अय्यूब नल्लामंदू ,यांच्या ‘ उपस्थितीत कै . रंगा अण्णा वैद्य सभागृह येथे गौरव पत्र , पांच हजार रुपये रोख सन्मान चिन्ह , पुस्तके देऊन सन्मान करण्यात आले.

प्रमुख पाहुणे सोलापूर विद्यापीठचे डॉ . शिवाजी शिंदे यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देत म्हणाले – प्रिंट मिडिया असो किवा इलेक्टॉनिक मिडीया असो सर्वांनी चांगल्या विचारांची पेरणी केली पाहिजे , शब्दांत मोठी ताकत असते , शब्दांचा वापर जपून करावा तरच समाजाचे प्रबोधन होईल .
पत्रकार समाजाचा तिसरा डोळा असतो म्हणून हे डोळे नेहमी स्वच्छ असले पाहिजे

या वेळी जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटके यांनी ही पत्रकारांना शुभेच्छा देत बाळ शास्त्री जांभेकरांची स्वच्छ पत्रकारिता आत्मसात करावी पत्रकार समाजातील सार्वजनिक मुद्दे उपस्थित करून सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याचे प्रमाणिक कार्य करावे . वृतपत्र हा चौथा स्थंब असल्यामुळे याचे जतन सर्वानी केले पाहिजे .
या वेळी गाढे अभ्यासक योगेश तुरेराव यांनी आर . एन . आय च्या नवीन तरतूदी वर मार्गदर्शन केले

पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार विश्वनाथ वनकोरे , , श्रीशैल चिंचोळकर , डॉ शफी चोबदार , प्रशांत जोशी , जुंजा , नागेश दांतकाळे , इक्बाल बागबान , बाळा साहेब वाघमोडे , , देविदास उत्पात , ‘ इम्तियाज काजी , नागेश कुलकर्णी , ॲड काटूळे ,माजी नगरसेविका मोहिनी पाकी , पत्रकार प्रशांत जोशी , दशरथ वडतिले , बाळा साहेब वाघमोडे ‘ नागेश कुलकर्णी , . पद्माकर कुलकर्णी ‘ सीए आनंद करवंदे , धनंजय कुलकर्णी , योगेश तुरेराव , शौकत काझी , मजहर अलोळी , वसंत चौधरी इ चा भेट वस्तू देवून सत्कार करण्यात आला .
पुरस्कार प्राप्त पैकी ज्येष्ठ पत्रकार
प्रमोद गोसावी व पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी ज्येष्ठ स्वर्गीय पत्रकार रंगा अण्णा वैद्य , बाबुराव जवकल , नल्लामंदू , रमेश महामुनी यांच्या जुन्या आठवणीना उजाळा देत संघाने कौतुक केल्या बद्दल आभार मानले .
सुत्र संचालन प्रा देविदास उत्पात यांनी केले तर आभार ज्येष्ठ पत्रकार सुभाष सुराणा यांनी मानले

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *