बीड

बीड मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मराठी पत्रकार दर्पण दिन साजरा

मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मराठी पत्रकार दर्पण दिन साजरा

बीड / सप्त नगरी न्युज ब्युरो

महाराष्ट्रात 6 जानेवारी हा दिवस ‘मराठी पत्रकार दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे
मराठी पत्रकार परिषद बीड शाखेच्या वतीने दैनिक लोकतंत्र कार्यालयात दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यानिमित्त त्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. आजच्या दिवशी १८३२ मध्ये त्यांनी दर्पण हे वृत्तपत्र सुरु करत मराठी पत्रकारितेचा पाया रचला होता, ज्यामुळे इतिहासात मराठी पत्रकारितेचे नवे पर्व सुरु झाले.

मराठी पत्रकारितेचा मुहूर्तवेढ रोवणारे महापुरुष आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी जन्म २० फेब्रुवारी १८१२ मध्ये एका सामान्य कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी आपले शिक्षण गावात पुर्ण केले आणि नंतर मुंबई येथे उच्च शिक्षणासाठी आहे. त्यांचे उच्च शिक्षण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात पूर्ण झाले आहे. येथेच त्यांना त्यांची विद्वत्ता लक्षात आली. त्यांनी अगदी लहान वयातच प्राध्यापक म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली. त्यांच्या विचारांनी, कार्यानी समाजात प्रबोधन घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यानंतर त्यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पण नावाचे पहिले मराठी नावाचे वृत्तपत्र सुरू केले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कुलकर्णी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकरांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बीड शहरांमध्ये मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दर्पण दिन साजरा करण्यात आला .या निमित्ताने विचाराची देवाण-घेवाण झाली. या कार्यक्रमाला मराठी पत्रकार परिषदेचे संभाजीनगरचे सचिव रवी उबाळे, विभागीय समन्वयक सुभाष चौरे, जिल्हाध्यक्ष विशाल साळुंके, संपादक संजय मालानी, संपादक तथा मराठी पत्रकार परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख संजय हांगे, संपादक तथा मराठी पत्रकार परिषदेचे हल्लाविरोधी कृती समितीचे समन्वयक अभिमन्यू धरत,तालुका समन्वयक मंगेश निटुरकर, अनिल अष्टपुत्रे, दिलीप शिंगाडे आदींची उपस्थिती होती.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *