
सोलापूर | सप्त नगरी न्युज ब्युरो
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा भाजपाच्या वतीने सोमवारी सोलापूर येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मेळाव्यात उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तसेच याप्रसंगी भारतीय जनता पार्टीकडून सोलापूर शहराच्या विकासासाठी वचननामा जाहीर करण्यात आला.

आपली शहरं विकसित झाली पाहीजेत या विचारातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अनेक योजना राज्यात राबविण्यात येत आहेत. विकासाचं हे चक्र अविरत सुरु राहण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेत भाजपाचा महापौर असणं गरजेचं आहे. यासाठी भाजपा परिवाराची विचारधारा प्रत्येक घराघरात पोहचवण्याचे आवाहन चव्हाण यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.
याप्रसंगी मंत्री जयकुमार गोरे, आमदार विजय देशमुख, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर पूर्वचे भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, सोलापूर शहरच्या भाजपा जिल्हाध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
- 0
- 0
- 0
- 0





