
सोलापूर महानगरपालिकेवर भाजपाची एक हाती सत्ता
सोलापूर|सप्त नगरी न्युज ब्युरो
सोलापूर महापालिका निवणूकीत एकुण १०२ जागेसाठी निवडणूक झाली होती त्यापैकी तब्बल ७९ ठिकाणी भाजपा ४ ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष, १ ठिकाणी काँग्रेस तर जवळपास ८ ठिकाणी एमआयएमचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे सोलापूर महापालिकेवर पालकमंत्री जयकुमार गोरे, आ देवेंद्र कोठे, आ सचिन कल्याणशेट्टी, आ सुभाष देशमुख आ विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बहुमत मिळवले आहे.

आणखी तीन प्रभागातील निकाल येणे बाकी आहे. तर या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला आणि उध्दव ठाकरे शिवसेनेला भोपळा फोडता आला नाही. या निवडणूकीत भाजपाने स्वबळाचा नारा दिला होता. तर एकनाथ शिंदे सेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने युती केली होती. तर काँग्रेस, उध्दव शिवसेना, मनसे यांची ही युती झाली होती. मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने सोलापूर महापालिकेवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे. तर या निवडणूकीत शिवसेना एकनाथ शिंदे सेनेचे उमेदवार सुरेश पाटील हे केवळ १९ मतांने पराभूत झाले आहेत. तर या निवडणूकीत तब्बल ६ माजी महापौरांचा पराभव झाला आहे. तर या निवडणूकीत एकनाथ शिंदे सेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी आपल्या सोबतच तीन उमेदवार निवडून आणण्यात यश मिळवले आहेत. निवडणूक निकालानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपा कार्यालया समोर जल्लोष करण्यात आला.
- 0
- 0
- 0
- 0





