जळगाव

श्रीमती देवकाबाई हडप यांना आदर्श माता पुरस्कार घोषित

श्रीमती देवकाबाई हडप यांना आदर्श माता पुरस्कार घोषित

अमळनेर / सप्त नगरी न्युज ब्युरो

अमळनेर- तालुक्यातील तापी नदीच्या काठावर वसलेल्या निम येथील माजी सरपंच स्व. अण्णासाहेब खंडू डिगंबर धनगर यांच्या पत्नी श्रीमती देवकाबाई खंडू हडप यांना पुणे येथील सुसंगत फाऊंडेशनच्या वतीने ‘आदर्श माता’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार घोषीत झाला आहे. श्रीमती देवकाबाई हडप यांना हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार रविवार दि. 25 जानेवारी रोजी सकाळी 9.30 वाजता एस.एम. जोशी सभागृह नवी पेठ, पत्रकार भवन जवळ, पुणे येथे प्रदान करण्यात येणार असून या समारंभास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, कॉसमॉस को ऑप बँक पुणेचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सी.ए. मिलींद काळे, पुणे येथील कोहिनुर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती डॉ. सुधाकर न्हाळदे यांनी दिली.

श्रीमती देवकाबाई या तालुक्यातील करणखेडे येथील मनोरे परिवाराच्या कन्या असून निम हे त्यांचे सासर आहे. आयुष्यभर शेती मातीशी नाळ जोडत त्यांनी स्व. खंडू अण्णांना साथ दिली. तिन्ही मुलांच्या प्रगतीकडे स्वत: लक्ष दिले. त्यांचा मोठा मुलगा आनंदा सर शहापुर तालुका अमळनेर येथे मुख्याध्यापक असून दुसरा मुलगा कैलास एरंडोल येथे पोलीस विभागात कार्यरत आहेत.लहान मुलगा दिलीप हा पुणे येथील ख्यातनाम बिल्डर, डेव्हलपर असून पृथ्वी ग्रुप सोबत आहेत. कष्टमय जीवन जगलेल्या देवकाताईंना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.



  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *