मुंबई शहर

धुळे विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या माजी ग्रंथपाल प्रा.अर्चना पांडे यांचे दुःखद निधन

धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालय व कमलाबाई अजमेरा महाविद्यालयाच्या माजी ग्रंथपाल प्रा. अर्चना अरविंद पांडे ( वय ७५ ) यांचे काल सायंकाळी अल्पशा आजाराने पनवेल येथे दुः खद निधन झाले . ग्रंथालय क्षेत्रात त्यांचे नाव लौकीक होते . असंख्य गरीब विद्यार्थ्यांना त्या अभ्यासासाठी पुस्तके उपलब्ध करून देत असत . त्यांचे पती स्व . अरविंद ए पांडे सर हे विद्यावर्धिनी येथे भूगोल विषयाचे नामांकित हेड ऑफ डीपार्टमेंट होते . सरांच्या निधना नंतर मॅडम निर्धाराने उभ्या राहील्या . स्वतः च्या शिक्षणा सोबतच शशांक व शिवरंजनी या दोन्ही अपत्यांना उच्च विद्याभूषित केले . त्यांचा मुलगा शशांक अमेरिकेत असून तो उद्या परतल्यावर पनवेल येथे उद्या अन्त्य संस्कार होतील . विद्यावर्धिनी परिवारातील आमच्या भगिनी अर्चना पांडे मॅडम यांना माजी विद्यार्थ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *