नेमसूशिलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली शस्त्रास्त्रांची माहिती

तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो
महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन सप्ताह पोलीस विभागाकडून उत्साहात साजरा करण्यात आला. पोलीस विभाग शांतता, सुव्यवस्था व संरक्षणाचे कार्य करीत असतात. त्यावेळी वेगवेगळ्या विभागाचे कार्य कश्याप्रकारे हाताळण्यात येते. याविषयी नेमसुशिल विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रांची माहिती पोलिस उपनिरीक्षक स्वप्नाली रोकडे यांनी दिली. वायरलेस कक्ष, कारागृह याविषयी माहिती सांगण्यात आली. उअक्कलकुवा पविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये, तळोदा पोलीस निरीक्षक राजन मोरे, पीएसआय अखिल पठाण, पोलीस हवालदार गोपनीय कक्ष अनिल पाडवी, विजय सोनवणे तसेच मनीलाल पाडवी, लेखनिक पोलीस हवालदार आदी उपस्थित होते.
- 0
- 0
- 0
- 0





