बदनापूर (जि. जालना) : तालुक्यातील हलदोला येथील दोन शेतकऱ्यांमध्ये शेतात जाण्याचा रस्त्याचा वाद असून याबाबत नायब तहसीलदारांनी पैसे मागितल्याचा आरोप करत शेतकऱ्याच्या मुलाने नायब तहसीलदारांच्या टेबलवर पैसे आणून टाकले. परंतु, नायब तहसीलदार हेमंत तायडे यांनी याबाबतचा आरोप फेटाळत पैशाची मागणी केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तालुक्यातील हलदोला येथील श्रीहरी जनार्दन मात्रे यांनी हलदोला शिवारातील गट […]
महाराष्ट्र
राज्यातील ५० ऐतिहासिक तीर्थक्षेत्रांवर माहितीपट, मराठवाड्यातील १३ पुरातन मंदिरांचा समावेश
नांदेड : महाराष्ट्राला लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि अद्वितीय स्थापत्यशैलीमुळे महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या राज्यातील ५० तीर्थक्षेत्रांवर माहितीपटाची निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी ३ डिसेंबर २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या माहितीपटाच्या निर्मितीसाठी राज्य शासनाने ४ कोटी ६२ लाख रुपये इतक्या भरीव रकमेला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील पर्यटन […]
तक्रार मागे घेण्यासाठी तहसीलदारास ब्लॅकमेल; मंडळ अधिकाऱ्यावर तुळजापुरात गुन्हा
धाराशिव : तुळजापुरातील तहसीलदार व मंडळ अधिकाऱ्यात पेटलेला वाद थेट आता खंडणीपर्यंत येऊन पोहोचला आहे. मंडळ अधिकाऱ्यानेे तहसीलदारांनी शिवीगाळ केल्याचा गुन्हा नोंद करताच तहसीलदारांनीही मंडळ अधिकाऱ्याने खंडणी मागितल्याची तक्रार दिली. यावरून दोघांविरुद्धही गुन्हे दाखल झाल्याने महसूल विभागातील नवा वाद चव्हाट्यावर आला. तुळजापूर तालुक्यातील आरळी बु. येथील मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल यांनी तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी […]
मोठ्या विमानांसाठी छत्रपती संभाजीनगर होणार सज्ज, विस्तारीकरणाला वेग
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी १३९ एकर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. भूसंपादनासाठी ८७.८२ कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला वितरित करण्यास मंगळवारी शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली. विमानतळाच्या विस्तारीकरणात प्रामुख्याने धावपट्टीची लांबी वाढणार आहे. यातून मोठ्या विमानांच्या उड्डाणांसाठी विमानतळ सज्ज होईल. चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विस्तारीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. चिकलठाणा, […]
“याचे कपडे काढून मारा”; ४ शिक्षकांकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, दाखला देईन धमकीमुळे विद्यार्थी गप्प
शिक्षणाच्या मंदिरातच एका विद्यार्थ्याला अमानुष मारहाणीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘तू आमचा टेबल का तोडला? असा प्रश्न विचारत नेवासा तालुक्यातील एका खासगी शिक्षण संस्थेतील चार शिक्षकांनी सातवीच्या एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली. या गंभीर प्रकारामुळे विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थ्याच्या जबाबावरून सोनई […]
नंदुरबारमध्ये निषेध मोर्चाला हिंसक वळण, जमावाकडून काही वाहनांची तोडफोड
नंदुरबार – येथील युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यावर आत जाऊ देन्याच्या मागणीवरून काही युवकांनी परिसरातील वाहने फोडली. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांना अश्रू धुरचा नळकांड्या फोडव्या लागल्या. नंदुरबारातील जय वळवी या युवकाच्या खुनातील आरोपीना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी व निषेध म्हणून बुधवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात […]
कांदा भरताना विपरीत घडलं, ट्रक्टरसह ३ चिमुकल्या विहिरीत बुडाल्या, आई-वडिलांचा टाहो!
धुळ्यातील साक्री तालुक्यातील गणेशपूर गावातून एक मन हेलावून टाकणारी दुर्घटना घडली. गावाजवळील एका शेतात कांदा भरण्याचे काम सुरू असताना, ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या तीन चिमुकल्या ट्रॅक्टरसह थेट ६० फूट खोल विहिरीत कोसळल्या. या दुर्घटनेत दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर, एका चिमुकलीला ग्रामस्थांनी वाचवण्यात यश मिळवले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही दुर्दैवी घटना […]
शेतकऱ्यांचा पैसा तिजोरीत पडून, ई-केवायसीने रोखली ३५५ कोटींची मदत
जळगाव : अतिवृष्टीसह पूरपरिस्थितीमुळे बाधित झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी शासनाने ३१ हजार ६२८ कोटींचे पॅकेज जाहीर करून निधीही उपलब्ध करून दिला. मात्र, ई-केवायसीसह तांत्रिक कारणास्तव लाभ न घेऊ शकलेल्या ५ लाख ४२ हजार १४१ शेतकऱ्यांचे ३५५ कोटी ५० लाख रुपये शासनाच्या तिजोरीतच पडून असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. त्यात एकट्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या तब्बल १६५ कोटी […]
कळणेत ओंकारची एंट्री, वन विभागाची डोकेदुखी वाढली
दोडामार्ग : मागील तीन महिन्यांपासून गोवा राज्यात व सावंतवाडी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीने दोडामार्ग तालुक्यात पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास डोंगरपाल गावातून तो कळणे परिसरात दाखल झाला. या अनपेक्षित पुनरागमनामुळे हत्तीबाधित गावातील ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले आहेत. एकीकडे गणेश टस्कर व दुसरीकडे ओंकार हत्ती दाखल झाल्याने वनविभागाची मात्र डोकेदुखी वाढली […]
६ तासांच्या शोधानंतरही बिबट्या न सापडल्याने गदारोळ
अलिबाग- सहा तासांहून अधिक काळ लोटूनही बिबट्या वन विभागाच्या हाती लागला नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली. सुरक्षेच्या कारणास्तव घरातच थांबलेल्या ग्रामस्थांचा संयम सुटू लागला आणि प्रशासनाविरोधात गदारोळ सुरू झाला. “बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा”, “नागरिकांच्या जीवाला धोका आहे” अशा घोषणा देत नागरिकांनी शोध मोहिमेबाबत नाराजी व्यक्त केली. परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसताच वाहतूक पोलीस […]










