तळोदा / सप्त नगरी न्युज
तळोदा येथील होमगार्ड पथकाकडून होमगार्ड 79 वर्धापन दिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात आला.
होमगार्ड संघटनेची स्थापना 6 डिसेंबर 1946 साली भारताचे तत्कालिन प्रधान मंत्री मुरारजी देसाई यांनी
केली. कालांतराने पूर्ण भारतात होमगार्ड संघटना स्थापन झाली.
आज 79 वा वर्धापन दिनानिमित्त तळोदा होमगार्ड पथकाकडून
तळोदा उपजिल्हा रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. तसेच मिशन हॉस्टेल येथे शालेय विद्यार्थ्यांना चप्पल वाटप केले. व तहसील कार्यालयात परिसरातील केरकचरा उचलून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच होमगार्ड पथ व कवायत पथ संचलन घेण्यात आले.
कार्यक्रमात तळोदा तालुका समादेशक अधिकारी
सुनील मगरे, वरिष्ठ पलटन नायक विजय माळी, पलटन नायक अमर जोहरी, पलटन नायक विरेन्द्र भाट, पलटन नायक नासिर मणियार, पलटन नायक विजय शेंडे आदी होमगार्ड कर्मचारी उपस्थित होते.


- 1
- 0
- 0
- 0





