नंदुरबार

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी;खरीप हंगामात 1 हजार हेक्टरवर राळा व वरई पिकाची लागवड करणार

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी;खरीप हंगामात 1 हजार हेक्टरवर राळा व वरई पिकाची लागवड करणार नंदुरबार, दिनांक 19 जून  (जिमाका):आकांक्षित जिल्हा अंतर्गत सन 2026-27 च्या जिल्हा वार्षिक विकास आराखडा योजनेतून जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी चालू खरीप हंगाम 2026-27 मध्ये तृणधान्य (Minor Millets) पिकाच्या क्षेत्रात वाढ करणे आणि पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व वाढवणे, या उद्देशाने ही विशेष मोहीम […]

नंदुरबार

खरीप हंगाम पूर्वतयारी व इंधन उपलब्धतेबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न.शेतकऱ्यांनी घाईने पेरणी करू नये – मा.पालकमंत्री डॉ.हसन मुश्रीफ यांचे आवाहन.

खरीप हंगाम पूर्वतयारी व इंधन उपलब्धतेबाबत जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न.शेतकऱ्यांनी घाईने पेरणी करू नये – मा.पालकमंत्री डॉ.हसन मुश्रीफ यांचे आवाहन. नंदुरबार | दि. 04 जून 2026 खरीप हंगामाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कृषी तयारी, बियाणे-खतांचा साठा तसेच इंधन उपलब्धतेचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय बैठक पार पडली. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे मा.पालकमंत्री डॉ. हसन मुश्रीफ […]

कोल्हापूर

खत वितरणाच्या पथदर्शी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

खत वितरणाच्या पथदर्शी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करावी -जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड मोबाईल अॅपद्वारे खत वितरणाचा कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प; ५ जूनपासून होणार सुरुवात कोल्हापूर, दि. 3 : केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने अनुदानित खत वितरणासाठी ‘फ्रेमवर्क फॉर फर्टीलायझर सेल’ (FFFS) हा नाविन्यपूर्ण पथदर्शी प्रकल्प येत्या शुक्रवार, दिनांक 5 जून रोजी सुरू […]

नंदुरबार

रांझणी परिसरात कापूस लागवडीस प्रारंभ

रांझणी परिसरात कापूस लागवडीस प्रारंभ तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपूर ,रोझवा पुनर्वसनसह परिसरात खरीप हंगामातील सर्वात महत्त्वाचे नगदी पीक कापूस लागवडीस प्रारंभ झाला असून परिसरात ऊन सावली काहीशी मृगछाया राहत असल्याने कापूस लागवडीचा निर्णय घेतला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.कापूस हे प्रमुख्याने उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात घेतले जाणारे पीक असून याच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांकडून शेतजमीन खोल […]

जळगाव

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा —जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन इफकोच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती मोहिमे’चा जळगावात शुभारंभ

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा —जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन इफकोच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती मोहिमे’चा जळगावात शुभारंभ जळगाव दिनांक 18 मे (जिमाका)- पिकांची उत्पादकता वाढवितानाच पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपरिक रासायनिक खतांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक व अधिक कार्यक्षम नॅनो खतांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. इफको […]

नंदुरबार महाराष्ट्र

शेतमालातील भेसळ व घातक रसायनांच्या वापराला प्रतिबंध;दोषींवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कडक कारवाई होणारमंगेशकुमार शहा

शेतमालातील भेसळ व घातक रसायनांच्या वापराला प्रतिबंध;दोषींवर अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कडक कारवाई होणारमंगेशकुमार शहा नंदुरबार, दिनांक 15 मे 2026 (जिमाका)राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्या, खाजगी बाजार आणि थेट पणन परवाना धारक क्षेत्रांमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या शेतमालाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले असून बाजार परिसरात खरेदी-विक्री होणाऱ्या शेतमाल, फळे, भाजीपाला आणि अन्नधान्यामध्ये होणारी भेसळ […]

महाराष्ट्र मुंबई शहर

१७ ते २० मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे

१७ ते २० मार्च दरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांना वादळी पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावे मुंबई, दि. १३ मार्च: १७ ते २० मार्च दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर आभाळी हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार ही स्थिती प्रामुख्याने विदर्भ, […]

खान्देश महाराष्ट्र

केळीवर फंगस रोगाच्या; निर्णयामुळे राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार

जळगाव|सप्त नगरी न्यूज ब्युरो जळगाव जिल्ह्यातील केळी पिकावर आढळलेल्या पनामा (टीआर४) फंगस रोगाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत या रोगाच्या प्रतिबंधासाठी शास्त्रीय उपाययोजना निश्चित करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांमध्ये व्यापक जनजागृती करण्यासाठी संयुक्त अभ्यास समिती स्थापन करण्याची घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. या निर्णयामुळे राज्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. […]

नंदुरबार

क्रॉपसॅप अंतर्गत हरभरा पिकाची महिला शेतीशाळा उत्साहात संपन्न

क्रॉपसॅप अंतर्गत हरभरा पिकाची महिला शेतीशाळा उत्साहात संपन्न नंदुरबार|सप्त नगरी न्यूज ब्युरो पिकांवरील किड व रोग सर्वेक्षण सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) 2025-26 अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील मौजा निमगाव येथे दि. 13 फेब्रुवारी  रोजी प्रगतीशील महिला शेतकरी गटासाठी हरभरा पिकावरील शेतीशाळेच्या चौथ्या वर्गाचे आयोजन करण्यात आले. हा प्रशिक्षण वर्ग  तालुका कृषी अधिकारी  एस. एस. राजपूत व मंडळ कृषी […]

नंदुरबार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा कोपर्ली परिसरात क्षेत्रीय पाहणी दौरा संपन्न

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचा कोपर्ली परिसरात क्षेत्रीय पाहणी दौरा संपन्न जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नंदुरबार श्री. शंकर किरवे यांचा नंदुरबार तालुक्यातील कोपर्ली परिसरात विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची क्षेत्रीय पाहणी दौरा संपन्न झाला. यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. एस. एस. राजपूत, उपकृषी अधिकारी श्री. करणसिंग गिरासे तसेच सहाय्यक कृषी अधिकारी श्री. सचिन दराडे, श्री. दीपक […]