वनहक्क समितीसमोर ३५० वनदाव्यांची सुनावणी

तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो:- दि. ०९ ऑक्टोबर
नंदुरबार जिल्ह्यातील वनहक्क दाव्यांच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी जिल्हास्तरीय वनहक्क समितीची सुनावणी तळोदा येथील याहामोगी सभागृहात घेण्यात आली.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठीयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुनावणीत एकूण ३५० वनदाव्यांची सुनावणी करण्यात आली. यावेळी दावेदारांचे म्हणणे जाणून घेत संबंधित प्रकरणांतील आवश्यक कागदपत्रे व नोंदींची तपासणी करण्यात आली.

यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी लघीमा तिवारी, सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा, संजय पवार, सहाय्यक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील, अशासकीय सदस्य कांतीलाल पाडवी यांच्यासह संबंधित अधिकारी, कर्मचारी व वनहक्क दावेदार उपस्थित होते.

वनहक्क दाव्यांची प्रक्रिया अधिक गतिमान, पारदर्शक आणि प्रभावी करण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कार्यवाही करण्यात येत आहे.

- 1
- 0
- 0
- 0





