खान्देश जळगाव

निवडणूक पूर्वतयारी: मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद निवडणुकीचा सविस्तर आढावा संपन्न

निवडणूक पूर्वतयारी: मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली विधान परिषद निवडणुकीचा सविस्तर आढावा संपन्न

जळगांव : दिनांक: १२ जून, २०२६

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि निकोप वातावरणात पार पाडण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी (CEO), महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक दुरचित्रवाणी परिषदेद्वारे (VC) संपन्न झाली.

बैठकीतील प्रमुख प्रशासकीय मुद्दे:

      मतदान केंद्रांवरील व्यवस्था: जिल्ह्यातील सर्व नियुक्त मतदान केंद्रांची सद्यस्थिती, तेथील पायाभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था आणि आदर्श आचारसंहितेचे (MCC) कडक पालन सुनिश्चित करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

     मतमोजणी नियोजन: मतदानानंतरची मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रस्तावित आराखडा, मतमोजणी केंद्र येथील तांत्रिक व्यवस्था आणि मनुष्यबळ व्यवस्थापनाच्या प्रस्तावावर सविस्तर आढावा घेऊन वरिष्ठ स्तरावरून महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.निवडणूक निधी: मतदान प्रर्कियेसंदर्भात आवश्यक निधीच्या अनुषंगाने आढावा घेण्यात आला.

   अचूकतेवर भर: मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी दरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या सर्व कायदेशीर तरतुदींचे व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.

    JalgaonDistrict #CollectorJalgaon #VidhanParishadElection #ChiefElectoralOfficer #ElectionPreparation #PollingStation #CountingPlan #DemocracyInAction #GoodGovernance #MaharashtraElections

    • 0
    • 0
    • 0
    • 0

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *