
तळोदा प्रकल्पातील कर्मचाऱ्यांच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात
500 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहभाग
तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तळोदा अंतर्गत येणाऱ्या शासकीय अनुदानित आश्रम शाळा व वस्तीगृहातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. या क्रीडा स्पर्धांमध्ये सुमारे 500 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला.
शनिवारी सकाळी पथराई येथील के.डी. गावित शैक्षणिक संकुलाच्या क्रीडांगणावर या स्पर्धेची उद्घाटन देवमोगरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र lकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी म्हणून प्रकल्प अधिकारी अनय नावंदर यांची उपस्थिती होती.या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव विभूती गावित,नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी संघटनेच्या सचिव ऋक्षिका गावित, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड,उत्तम राऊत,देवेंद्र वाणी, अरविंद वळवी,बबन मुगळे,आदी उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धांमध्ये क्रिकेट, कबड्डी,हॉलीबॉल,लांब उडी,उंच उडी,बुद्धिबळ अशा सांघिक व व्यक्तिगत क्रीडा प्रकारांच्या समावेश करण्यात आला होता. तालुका निहाय अनुदानित व शासकीय अशा गटांमध्ये या क्रीडा स्पर्धेतील सामने खेळवण्यात आले. महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही उत्साह पूर्ण सहभाग या क्रीडा स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला.
विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांच्या सर्वांगीण विकासाचे धोरण आदिवासी विकास विभागाने आखले त्यानुसार सांघिक व व्यक्तिगत क्रीडा प्रकारात या क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात करण्यात आला आहेत व तळोदा प्रकल्प हे नाशिक विभागातील पहिले असल्याची माहिती प्रास्ताविकात बबन मुगळे यांनी दिली.
मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या क्रीडा स्पर्धांमध्ये सर्व खेळांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह अनुदानित शासकीय आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले असून सर्वांसाठी या क्रीडा स्पर्धा एक पर्वणी ठरले आहेत.
- 0
- 0
- 0
- 0





