
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची
आर्वीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट
धुळे, दि. 6 (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी आज धुळे तालुक्यातील आर्वी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन पाहणी केली.
यावेळी जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती घुगे, डॉ. सलोनी पाटील, औषध निर्माता अधिकारी सुनील पेटकर, शिक्षणाधिकारी मनीष पवार आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी करीत विविध सूचना केल्या. आरोग्य केंद्र परिसर नियमितपणे स्वच्छ ठेवावा, रुग्णांना आवश्यक सोयी सुविधा पुरवाव्यात. औषधांचा पुरेसा साठा राहील याची दक्षता घ्यावी. परिसरातील नागरिकांची नियमितपणे आरोग्य तपासणीसाठी मोहीम राबवावी आदी सूचना केल्या.
- 0
- 0
- 0
- 0





