पुणे

    समाजात पुन्हा एकदा मानवी मूल्ये आणि आपुलकी रुजवण्यासाठी सुसंवाद साधणे ही काळाची गरज आहे- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस

दिग्गजांची पत्रे’ पुस्तक प्रकाशन

समाजात पुन्हा एकदा मानवी मूल्ये आणि आपुलकी रुजवण्यासाठी सुसंवाद साधणे ही काळाची गरज आहे , असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी आज पुण्यात केले .

पुणे|सप्त नगरी न्युज ब्युरो
पुण्यातील पत्रकार संघात ‘दिग्गजांची पत्रे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षसथानी सिम्बायोसिसचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार होते . यावेळी ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, एस. के कुलकर्णी , महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष ब्रिजमोहन पाटील आदी उपस्थित होते. दिग्गजांच्या पत्रांचा ऐतिहासिक आणि वैचारिक ठेवा आहे . पत्रे ही केवळ कागदाचे तुकडे नसून तो दोन व्यक्तींमधील संवादाचा एक जिवंत दस्तावेज असतो.

पत्रांमधून लेखकाच्या मनातील खरे भाव आणि विचार समजण्यास मदत होते. असे पुण्यात ‘दिग्गजां दिग्गजांनी लिहिलेली पत्रे हा समाजासाठी एक मोठा वैचारिक वारसा आहे. या पत्रांमधून नव्या पिढीला मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळते.असेही सबनीस म्हणाले. आजच्या डिजिटल युगात पत्रांची जागा व्हॉट्सॲप आणि ईमेलने घेतली असली, तरी पत्रांमधील जी आपुलकी आणि खोली असते, ती या माध्यमांतून मिळत नाही. त्यामुळे अशा पुस्तकांच्या माध्यमातून पत्रांच्या जगाचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे. असे डॉ. मुजुमदार यांनी यावेळी पुस्तकाचे संपादन करणाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन केले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *