तळोदा, एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूलात सावित्रीबाई फुले जयंती साजरा

तळोदा / सप्त नगरी न्युज ब्युरो
तळोदा, येथील एस. ए. मिशन इंग्लिश मीडियम स्कूल येथे शनिवार दि. 3 जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रमुख म्हणून शाळेतील महिला शिक्षिका श्रीमती मनीषा मगरे , हंसा कलाल, शिखा श्रीवास्तव व मिल्क वळवी या ज्येष्ठ महिला शिक्षिका होत्या. याप्रसंगी इयत्ता दुसरीचे विद्यार्थिनी पाटील आरुषी, वळवी महालक्ष्मी यांनी सावित्रीबाईच्या वेशभूषेत भाषण केली. तसेच इयत्ता सातवीची पलक मराठे, इयत्ता नववीची साक्षी बागुल व इयत्ता दहावीची तनुश्री सूर्यवंशी व प्रीत सोनगड वाला तसेच इयत्ता पाचवीच्या हितेश पटेल या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाच्या भाषणाद्वारे परिचय करून दिला.

या प्रसंगी मुख्याध्यापक सत्यजित नाईक यांनी उपस्थितांना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील संघर्ष ,स्त्री शिक्षणसाठी केलेली अथक परिश्रम व समाजसेवेसाठी केले उल्लेखनीय कामगिरी याबद्दल मार्गदर्शन केले. आज सावित्रीबाईंच्या योगदानामुळे या सावित्रीचे लेकी या प्रत्येक स्तरावर पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून कार्य करत आहेत याच्या अभिमान श्री. नाईक सरांनी बोलून दाखवला. हंसा कलाल मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित सुंदर कविता सादर केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कुमार मगरे यांनी तर आभार प्रदर्शन नीलकंठ सूर्यवंशी सर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
- 0
- 0
- 0
- 0





