नंदुरबार

तळोदा महाविद्यालयात इको-फ्रेंडली होळीचा उत्साह; विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांचे मार्गदर्शन

तळोदा महाविद्यालयात इको-फ्रेंडली होळीचा उत्साह; विद्यार्थ्यांना नैसर्गिक रंगांचे मार्गदर्शन

तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो तळोदा येथील शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गो. हु. महाजन व शी.ल माळी कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरणपूरक (इको-फ्रेंडली) होळी उत्साहात साजरी करण्यात आली.
होळीच्या सणाला पर्यावरणस्नेही पद्धतीने साजरा करावा, रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करावा आणि होळी पेटवताना प्रदूषण कमी होईल अशा पद्धती अवलंबाव्यात, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ही विशेष होळी आयोजित करण्यात आली होती.

शाळेचे प्राचार्य अमरदीप महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात शाळेचे कलाशिक्षक संकेत माळी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी नैसर्गिक रंग कसे तयार करावेत आणि वापरावेत, होळीच्या भस्मात कोणत्या वस्तू टाकता येतील (जसे की कोरड्या फुलांचे पाकळ्या, गायीचे शेण इत्यादी), तसेच होळीच्या सणाचे खरे महत्त्व आणि पर्यावरण संरक्षण याबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी स्काऊट व गाईडचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास शाळेचे उपमुख्याध्यापक सुनील सूर्यवंशी, पर्यवेक्षक अंबरीश सूर्यवंशी, पर्यवेक्षक पी. आर. वळवी, सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वप्नील महाजन, प्रा. संदीप मगरे, प्रमोद सोनवणे, योगेश पवार, मनीषा सोनवणे, शारदा वळवी तसेच इतर अनेक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.
या इको-फ्रेंडली होळीमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागरूकतेची भावना अधिक दृढ झाली असून, रासायनिक रंग आणि अतिवापरामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे. शाळेने अशा प्रकारे पर्यावरणस्नेही सण साजरे करण्याची परंपरा सुरू केल्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *