नंदुरबार

गुढीपाडवा पट वाढवा’ उपक्रमांतर्गत जि. प. शाळा सोनवल येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा!सजलेली बैलगाडी आणि विद्यार्थ्यांच्या नृत्याने वेधले लक्ष; १५ चिमुकल्यांचा शाळा प्रवेश

‘गुढीपाडवा पट वाढवा’ उपक्रमांतर्गत जि. प. शाळा सोनवल येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा!
सजलेली बैलगाडी आणि विद्यार्थ्यांच्या नृत्याने वेधले लक्ष; १५ चिमुकल्यांचा शाळा प्रवेश

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सोनवल त. बो. येथे ‘गुढीपाडवा पट वाढवा’ या राज्यव्यापी उपक्रमांतर्गत अतिशय उत्साहात आणि आनंदमय वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्ताने इयत्ता पहिलीमध्ये १५ नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, त्यांचे स्वागत अत्यंत आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्यात आले.

                बैलगाडीतून निघाली प्रभात फेरी ग्रामीण संस्कृतीचा वारसा जपत, शाळेत नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांची सजवलेल्या बैलगाडीतून संपूर्ण गावातून वाजत-गाजत प्रभात फेरी काढण्यात आली. ही बैलगाडी सजवण्यासाठी आणि उपलब्ध करून देण्यासाठी शत्रुघन भिल यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी पालकांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.
           विद्यार्थ्यांचे बहारदार सांस्कृतिक सादरीकरण
प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने शाळेतील जुन्या विद्यार्थ्यांनी ‘आमची शाळा जिल्हा परिषद शाळा’ या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले. तसेच, इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांनी ‘देवा मला शाळेत जायचं आहे’ या गाण्यावर हृदयस्पर्शी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली.
मान्यवरांचे मार्गदर्शन व सहकार्य
कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय देवरे साहेब यांनी उपस्थित ग्रामस्थांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या उपक्रमासाठी गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश साळवे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय मोरे, माजी पंचायत समिती सदस्य सखाराम अण्णा भिल, ग्रामस्थ गणेश कोळी, तसेच अनिल पवार आणि सागर भिल यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष सहकार्य केले.
नियोजन आणि परिश्रम
शाळेचे मुख्याध्यापक रुपेशकुमार दिगंबर नागलगावे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमासाठी श्रीमती जयश्री उरगुंडे व श्रीमती ज्योती पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच शालेय कर्मचारी सुनिताताई कोळी व बिंद्राताई मोरे यांनीही मोलाचे सहकार्य केले.
या अभिनव उपक्रमामुळे सोनवल परिसरातील शैक्षणिक वातावरणात चैतन्य निर्माण झाले असून, १५ नवीन विद्यार्थ्यांच्या प्रवेशामुळे शाळेचा पट वाढण्यास मोठी मदत झाली आहे.

  • 2
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *