जळगाव

आधुनिक तंत्रज्ञानातून रोप निर्मितीला चालना टिश्यू कल्चर लॅब व मेहरूण रोपवाटिकेस जिल्हाधिकारी यांची भेट

आधुनिक तंत्रज्ञानातून रोप निर्मितीला चालना टिश्यू कल्चर लॅब व मेहरूण रोपवाटिकेस जिल्हाधिकारी यांची भेट


मेहरुण, जि. जळगाव

जिल्हाधिकारी यांनी सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव यांच्या टिश्यू कल्चर लॅबला भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी प्रयोगशाळेतील कामकाज, उपलब्ध यंत्रसामग्री आणि टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाद्वारे रोप निर्मितीच्या प्रक्रियेची माहिती घेतली.

यावेळी विभागीय वन अधिकारी श्री. महेश झांजुर्णे यांनी जिल्हाधिकारी यांना टिश्यू कल्चर लॅबमधील कामकाज, रोप निर्मितीची प्रक्रिया, उपलब्ध यंत्रसामग्री व या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोपे तयार करण्याच्या संभाव्यतेबाबत माहिती दिली.

विभागीय वन अधिकारी यांनी प्रयोगशाळेतील कामकाज, रोप निर्मितीची प्रक्रिया तसेच या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मोठ्या प्रमाणावर रोपे तयार करण्याच्या संभाव्यतेबाबत माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी विविध प्रजातींची जास्तीत जास्त रोपे तयार करण्यासाठी टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या मेहरूण रोपवाटिकेस भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.

या भेटीदरम्यान सहाय्यक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *