छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जळगाव

देशातील रेल्वे कॉरिडोर मुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार- मंत्री रक्षा खडसे

देशातील रेल्वे कॉरिडोर मुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार- मंत्री रक्षा खडसे

छत्रपती संभाजी नगर |सप्त नगरी न्यूज ब्युरो

देशात रेल्वे कॉरिडॉर उभारणीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. मुंबई, पुणे येथे कॉरिडॉर होणार असल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार आहे. मराठवाडा आणि खान्देशाला रेल्वेद्वारे जोडण्याची घोषणा झाली आहे.


देशात रेल्वे कॉरिडॉर उभारणीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. मुंबई, पुणे येथे कॉरिडॉर होणार असल्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळणार आहे. मराठवाडा आणि खान्देशाला रेल्वेद्वारे जोडण्याची घोषणा झाली आहे. या कामाच्या सर्वेक्षणासाठी निधी मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने केंद्रीय अर्थसंकल्पावर मंत्री रक्षा खडसे या भाजप कार्यालयात बोलत होत्या. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मत्री अतुल सावे, शहराध्यक्ष किशोर शितोळे, समीर राजूरकर, गोविंद केंद्रे उपस्थित होते. ‘विकसित भारत संकल्पासाठी युवकांचा विचार केंद्रस्थानी ठेवून अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे. कृषी क्षेत्रात एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

शेतकरी कंपन्यांच्या माध्यमातूनशेतमालाला भाव मिळवून देणे, ई-मार्केटद्वारे तरतूद करणे, बियाणे-खते सहकाराच्या माध्यमातून उपलब्ध करणे, कोल्ड स्टोरेज आणि प्रक्रिया उद्योग उभारणीचे नियोजन आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ४० ते ५० टक्के अनुदान दिले जाणार आहे. महिला बचत गटांसाठी विशेष तरतूद आहे. अनेक गटांची उलाढाल एक ते दोन कोटी रुपये आहे. देशाच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांना उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी सहाय्य केले जाणार आहे’, असे खडसे यांनी सांगितले.

मेडिकल टुरिझमला प्रोत्साहन देणे, पुरातत्त्व वास्तूंचे संवर्धन करुन पर्यटन क्षेत्रात रोजगार वाढविणे, कंटेट क्रिएटीव्हीचे प्रशिक्षण देऊन रोजगार निर्मिती आणि क्रीडा क्षेत्रात राज्य व केंद्राच्या सहाय्याने प्रशिक्षकांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार आहे, अशी माहिती खडसे यांनी दिली.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *