तळोदा श्री.बडादादा गणपती नवयुवक मंडळ व श्री.बडादादा फाउंडेशन, यांच्या संयुक्त विद्यमाने उपक्रम..
निर्माल्य काढून तापी नदी परिसर केला स्वच्छ…..
भविष्यात नदीपात्रात निर्माल्य न टाकता ते संकलन केंद्रावर देण्याचे आवाहन
तळोदा: सप्त नगरी न्यूज ब्युरो:-
श्रद्धा, संस्कृती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत श्री बडादादा गणपती नवयुवक मंडळ व श्री बडादादा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तापी नदी परिसरात निर्माल्य संकलन अभियान राबविण्यात आले.
पूजेनंतर फुले, हार, नारळ तसेच इतर निर्माल्य नदीपात्रात विसर्जित केल्यामुळे नदीच्या स्वच्छतेवर आणि पर्यावरणावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन मंडळ व फाऊंडेशनच्या वतीने तापी नदी परिसरात पडलेले निर्माल्य संकलित करून त्याचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
या अभियानाच्या माध्यमातून “श्रद्धा जपूया, पण निसर्गाचीही काळजी घेऊया” असा सामाजिक आणि पर्यावरणपूरक संदेश नागरिकांना देण्यात आला.
तापी नदी ही केवळ जलस्रोत नसून परिसरातील नागरिकांच्या श्रद्धा आणि भावनांशी जोडलेली जीवनदायिनी आहे. त्यामुळे तिचे पावित्र्य, स्वच्छता आणि नैसर्गिक सौंदर्य जपणे ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.
“निर्माल्य नदीत नाही, योग्य ठिकाणी देऊया… तापी स्वच्छ ठेवूया, तापीचे पावित्र्य जपूया!” या आवाहनासह नागरिकांनीही भविष्यात नदीपात्रात निर्माल्य न टाकता ते संकलन केंद्रावर देण्याचे आवाहन करण्यात आले.
या उपक्रमात श्री.बडादादा गणपती नवयुवक मंडळ व श्री. बडादादा फाउंडेशनचे
पदाधिकारी
रोहन कलाल,नयन लोहार,निखिल गुरव,विनित मोराणकर,सुयोग पाटील,नयन पाटील ,संकेत पाटील,मिलिंद गुरव,पवन गुरव,स्वामी गुरव,दर्शन गुरव,विशू वंजारी,गौरव गुरव,हर्ष वाणी ,कोहिनुर दातीर,उन्मेष गुरव,सिद्धेश गुरव,ओम गुरव,उदय राठोड,गणेश कलाल व शनिगल्लीतील नागरिकानी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.
- 0
- 0
- 0
- 0





