
तळोदा नगर परिषद उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या सौ. शीतल लक्ष्मण पाडवी (पटेल) यांचा एक मताने विजयी..

स्वीकृत सदस्य पदी राष्ट्रवादीतर्फे गिरधर सागर तर शिवसेनेचे हितेंद्र क्षत्रिय यांची बिनविरोध निवड…

तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो
तळोदा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी व स्वीकृत सदस्य निवडी साठी पीठासीन अधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ भाग्यश्री चौधरी यांची अध्यक्षतेखाली विशेष सभा पार पडली.

उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी तर्फे शितल लक्ष्मण पाडवी (पटेल) तर शिवसेनेचे कपिल सुनील कर्णकार व मोनिका सुरज माळी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. कपिल कर्णकार यांनी माघार घेतली दोन अर्ज शिल्लख राहिले, हात उंचावून मतदान झाले.
उपनगराध्यक्षपदी सौ. शितल पाडवी यांचा एक मताने विजयी

राष्ट्रवादीतर्फे सौ. शीतल लक्ष्मण पाडवी (पटेल) यांना 11 मते तर भाजपा शिवसेनाच्या मोनिका सुरज माळी यांना 10 मते मिळाली उपनगराध्यक्ष पदी सौ. शीतल लक्ष्मण पाडवी ह्या एक मताने विजयी झाल्याचे पिठासीन अधिकारी तथा लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ भाग्यश्री योगेश चौधरी यांनी घोषित केले.
स्वीकृत नगरसेवकपदी गिरधर सागर व हितेंद्र क्षत्रिय यांची बिनविरोध निवड

नंतर स्वीकृत सदस्य साठी राष्ट्रवादीतर्फे गिरधर रामचंद्र सागर तर शिवसेना भाजपात गटातर्फे हितेंद्र सरवसिंग क्षत्रिय यांचे बिनविरोध निवड करण्यात आले. सदस्य पदासाठी राष्ट्रवादीचे गिरधर रामचंद्र सागर शिवसेना तर्फे हितेंद्र सरवसिंग क्षत्रिय यांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्ष सौ भाग्यश्री चौधरी यांनी घोषित केले. समर्थकांनी फटाक्याची अतिश बाजी केली. राष्ट्रवादी व भाजपा शिवसेना गटाचे नगरसेवक उपस्थित होते. निवडणूक कामी मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी काम पाहिले.
- 0
- 0
- 0
- 0





