तळोदा वरिष्ठ महाविद्यालयात आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकात समाविष्ट विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनुदान वाटप

तळोदा : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- तळोदा येथील वरिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकात समाविष्ट आहेत अशा विद्यार्थ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील विद्यार्थी विकास विभागाकडून शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून ८८ हजार रुपये मंजूर करण्यात आले होते. या रकमेचे धनादेश महाविद्यालयीन ट्रस्टचे सचिव व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत दलाल विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. स्वप्निल वाणी यांच्या हस्ते प्रदान वितरित करण्यात आले. लाभार्थ्यांमध्ये मयुरी गागरे, डिंपल शेंडे, दिव्या ज्ञानेश्वर मराठे, मनस्वी नवले, हर्षदा शाम मराठे, हर्षदा सुरेश मराठे, जागृती ढोले, प्राची तिवारी, रोहिणी गोसावी, दिपाली चव्हाण, रोशनी चव्हाण, टिशा जैन, तनिषा मराठे, शितल मराठे, प्रतिक्षा गिरासे, दामिनी राजपूत, कीर्ती मराठे व दिव्या भगवान मराठे यांचा समावेश होता. याप्रसंगी सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. कमलेश बेडसे, सहाय्यक महिला विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. सौ. ज्योत्स्ना पिंपरे, प्रा. डॉ. राजेंद्र मोरे, प्रा. डॉ. जयपाल शिंदे, प्रा. डॉ. गौतम मोरे, मनीष कलाल व संतोष केदार इत्यादी उपस्थित होते.
- 0
- 0
- 0
- 0





