धुळे

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर साईकृपा पाणपोईचे उद्‌घाटन

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर साईकृपा पाणपोईचे उद्‌घाटन

धुळे – येथील साक्री रोडवरील यशवंतनगर मधील सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक प्रमोद ढवळे, आनंद (छोटू) ढवळे, विशाल ढवळे परिवाराच्या खर्चाने ‘रामनवमी’ या शुभदिनी ‘साईकृपा पाणपोई’ चे उद्‌घाटन ज्येष्ठ पत्रकार गो.पि. लांडगे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. ‘साईकृपा पाणपोई’ मुळे वाटसरु, तसेच परिसरात ग्रामीण भागातून येणारे भाजीपाला विक्रेते यांची पेयजलाची सोय होणार आहे. उपस्थितांनी ढवळे परिवाराच्या सेवाभावी उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी माजी नगरसेवक प्रशांत श्रीखंडे, सामाजिक कार्यकर्ते राजेश ओहोळ, राजू वैद्य, पोपटराव मोरे, बापूजी अहिरे, भैय्या बोरसे, गजेंद्र कासारे, मोहन परदेशी, अल्ताफ पठाण, करण मोरे, राजू वैद्य, राकेश देवासी आदी मान्यवर उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *