नंदुरबार

खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

नंदुरबार |सप्त नगरी न्यूज ब्युरो अक्कलकुवा तालुक्यातील खापर गावात आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या आरोग्य विभागामार्फत, प्लॅन इंडिया यांच्या Self-Care for New Moms and Kids Under 5 प्रकल्पांतर्गत, तसेच Reckitt यांच्या सहयोगाने आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमादरम्यान महिलांच्या आरोग्य, पोषण, स्वच्छता आणि स्व-देखभाल (Self-Care) याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. तसेच महिलांची कुटुंब व समाजातील महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करत महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला.


कार्यक्रमात आरोग्यदायी जीवनशैली, मातृ व बाल आरोग्य, योग्य आहार तसेच लहान मुलांच्या संगोपनाबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे, स्व-देखभालीची सवय रुजविणे आणि निरोगी कुटुंब व समाज घडविण्यासाठी महिलांना सक्षम करणे हा आहे.

या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून डॉ. तृप्ती पाटील (तालुका आरोग्य अधिकारी), सौ. आशा भोई (CDPO),  किरण पाडवी (सरपंच),  विनोद धोदरे (ग्रामसेवक),  विनोद कामे (उपसरपंच), सौ. मंगला वसावे (सुपरवायझर) आणि सौ. सुनीता पाडवी (सुपरवायझर) उपस्थित होते. तसेच प्लान इंडिया टीमचे ब्लॉक ऑफिसर श्री. विनोद उन्हाळे, हिरा वळवी आणि अंजना वडवी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमास आरोग्य विभाग, ICDS विभाग, अंगणवाडी सेविका तसेच स्थानिक महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

  • 1
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *