
लुपिन फाऊंडेशन तर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा
तळोदा |सप्त नगरी न्यूज ब्युरो लुपिन ह्यूमन वेलफेअर अँड रिसर्च फाऊंडेशनच्या वतीने दिनांक 8 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांचे सक्षमीकरण, आरोग्याबाबत जागरूकता तसेच समाज आणि शेती क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा गौरव करणे हा होता.

कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अभंग जाधव (जिल्हा समन्वयक, अरमान स्वस्थ कदम, नंदुरबार), भाग्यश्री मोरे आणि ज्योती पाडवी उपस्थित होते. मान्यवरांनी महिलांच्या आरोग्य, पोषण आणि सक्षमीकरणाच्या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमादरम्यान महिलांचे आरोग्य व पौष्टिक आहार या विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. यामध्ये महिलांना संतुलित आहाराचे महत्त्व, आरोग्याची काळजी घेण्याचे उपाय तसेच निरोगी जीवनशैली याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
तसेच PU क्षेत्रातील शेतीमध्ये मौल्यवान योगदान देणाऱ्या पाच महिला शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमात महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून वातावरण अधिक उत्साहपूर्ण केले.

या कार्यक्रमाला गावाचे पोलीस पाटील सुरेश नाईक, माजी सभापती शांतीबाई पवार, शेतकरी रमेश नाईक, गोमती वळवी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका तसेच गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम BCI प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील सैंदाने, प्रशिक्षण समन्वयक कुशावर्त पाटील, जिल्हा प्रकल्प समन्वयक चंदन टोक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तळोदा पियू चे पियू व्यवस्थापक धनसिंग पावरा यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीपणे पार पडला.
कार्यक्रमाला BCI प्रकल्पातील विविध गावांतील शेतकरी, तळोदा PU चे कृषी मित्र तसेच गावातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली…
- 1
- 0
- 0
- 0





