महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांचे समाधान,कासेगांव करकंब मंडळातून 1 हजार 864 विविध सुविधा पुरवण्यात आल्या

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातून नागरिकांचे समाधान

कासेगांव करकंब मंडळातून 1 हजार 864 विविध सुविधा पुरवण्यात आल्या

पंढरपूर दि(07)- महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन कामाला वेग देण्यासाठी आणि नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत आज तालुक्यातील कासेगांव, करकंब या मंडळातून 1 हजार 302 विविध सेवा व 562 विविध दाखले असे एकूण 1 हजार 864 सेवा व विविध दाखले देण्यात आले असल्याची माहित प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिली.

या अभियानातंर्गत निकाली काढण्यात आलेले फेरफार 201, सातबारा मधील दुरुस्ती 24, डिजिटल सातबारा 224, 8 अ उतारे 176, विविध दाखले 562, एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत निकालात काढण्यात आलेले अर्ज 7, भूसंपादन प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्यात आलेली प्रकरणे 2, सामाजिक योजना 45, शिधापत्रिका 221, कृषी यांत्रिकीकरण, फलोत्पादन व कृषी सिंचन योजना 106, आभा कार्ड, एच.बी, तपासणी व औषधोपचार 144, ई- मोजणी फेरफार नकाशा 152,आदी सेवा व दाखले देण्यात आले. यामध्ये कासेगाव मंडळातून 832 तर करकंब मंडळातून 1 हजार 32 विविध सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात आल्याचे प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी सांगितले.

14 मार्चला भाळवणी, पुळुज शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी खर्डी, पटवर्धन कुरोली, शुक्रवार दि. 17 एप्रिल रोजी भंडीशेगाव, रोपळे शुक्रवार दि. 8 मे रोजी पंढरपूर तर शुक्रवार दि. 15 मे रोजी तुंगत चळे या मंडळात शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी पंढरपूर तालुक्यातील संबधीत मंडळातील जास्तीत जास्त नागरिकांनी या महाराजस्व समाधान शिबिर मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार श्री. लंगुटे यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख, पंचायत समिती सदस्य प्रमोद देशमुख, शहाजी मुळे, राहुल पूरवत, माजी जि.प. सदस्य हरिभाऊ गावंदरे, बाळासाहेब देशमुख, भूमी अभिलेख उपाधिक्षक पूजा आवताडे, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड, दीपक शिंदे, दुय्यम निबंधक श्री निराळी, सहा. महसूल अधिकारी दादा गावंदरे, तसेच संबंधित मंडळाचे मंडळ अधिकारी व तलाठी तसेच कर्मचारी उपस्थित होते ‌.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *