महाराष्ट्र

संरक्षण क्षमता महोत्सव २०२५-२६’ या जनजागृती उपक्रम

केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्य शासनाच्या सहकार्याने आयोजित ‘संरक्षण क्षमता महोत्सव २०२५-२६’ या जनजागृती उपक्रमाचा मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली प्रभादेवी रवींद्र नाट्य मंदिर येथे शुभारंभ करण्यात आला.

नैसर्गिक तेल व वायूची बचत करणे ही देशाची सेवा आहे. विकसित भारत २०४७ च्या उद्दीष्टामधील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे इंधन बचत हे ध्येय असून प्रत्येकाच्या सहभागाने देश हे ध्येय साध्य करेल. तेल व वायूचे संवर्धन करणे म्हणजे हरित ऊर्जेचा अंगीकार करणे हा आपल्या प्रत्येकाच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचे राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी, महाराष्ट्र बीपीसीएलचे प्रमुख रिटेल (पश्चिम)चे थॉमस जेम्स, एमएच-१ आणि गोवा, बीपीसीएलचे राज्य प्रमुख (रिटेल) चे मिहिर जोशी,

एचपीसीएलचे उपमहाव्यवस्थापक बरुण कुमार, आयओसीएलचे महाव्यवस्थापक देवांशू मिश्रा, गेल इंडिया लिमिटेडचे महाव्यवस्थापक (विपणन) जितेंद्र गुप्ता, राज्य समन्वयक विभाग मुख्य प्रबंधक दीपक वाघ, राज्य समन्वयक विभाग वरिष्ठ प्रबंधक रितेश जाधव, शालेय विद्यार्थ्यी तसेच राज्यातील विविध इंधन वितरक उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *