नंदुरबार

अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या जे.सी.बी.वाहनाचा लिलावदत्तात्रय जाधव

अवैध गौणखनिज उत्खनन करणाऱ्या जे.सी.बी.वाहनाचा लिलाव
दत्तात्रय जाधव

नंदुरबार, दिनांक 25 फेब्रूवारी, (जिमाका वृत्त) :
नवापूर तालुक्यातील अवैध गौणखनिज उत्खनन आणि वाहतूक करताना जप्त करण्यात आलेले जे.सी.बी.वाहन क्रमांक BR-27-GA-1358 चा लिलाव 05 मार्च, 2026 रोजी दुपारी 12.00 वाजता तहसील कार्यालय, नवापूर येथे होणार असल्याची माहिती तहसिलदार दत्तात्रय जाधव यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.

सदर जे.सी.बी. वाहन जप्त करुन खांडबारा पोलीस स्टेशन येथे लावण्यात आलेले आहे. वाहन मालकाला दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आले होते, परंतु त्यांनी अद्यापपर्यंत दंडाची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या तरतुदींनुसार सदर वाहनावर जमीन महसुलाची थकबाकी समजून हा लिलाव करण्यात येत आहे .

सर्व इच्छुक नागरिकांनी या लिलावासाठी तहसील कार्यालय, नवापूर येथे उपस्थित राहावे, असेही आवाहन तहसीलदार श्री. जाधव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे .

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *