नंदुरबार महाराष्ट्र

मुंबईत संजय पुराणिक यांनी बाल सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला

मुंबईत संजय पुराणिक यांनी बाल सुरक्षा आयोगाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्विकारला

तळोदा : मुंबई येथे १५ एप्रिल रोजी बाल सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष संजय पुराणिक यांनी कार्यालयात पदभार स्विकारतांना बालमजुरी, बालविवाह, अत्याचार आणि शिक्षण आरोग्यापासून वंचितता यांसारख्या समस्यांवर ठोस उपाययोजना राबविणे, तसेच बालकांच्या हक्कांचे प्रभावी संरक्षण करण्यावर भर देणार असल्याचे सांगत बालकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी प्रभावी काम करण्याची ग्वाही दिली.


यावेळी बाल सुरक्षा आयोगाचे नवनियुक्त सदस्य श्रीम.गितांजली बालाजी बुटी,शुभांगी संजय तांबट, संजय निळकंठराव लाखेपाटील, अतुल आनंदराव देसाई, प्रवीण संजाबराव भुजाडे,श्रीम. मिलन देवेंद्र जंगम हे उपस्थित होते. यांनी देखिल यावेळी आपल्या सदस्य पदाचा पदभार स्वीकारला. आयोगाचे सचिव पंकज देवरे यांनी याप्रसंगी बाल सुरक्षा आयोगाचे अध्यक्ष ॲड संजय पुराणिक व अन्य सदस्याचे स्वागत केले.
बालकांचे हक्क हे केवळ कायद्यापुरते मर्यादित नसून ते समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. भारताच्या संविधानाने प्रत्येक बालकाला शिक्षण, आरोग्य, संरक्षण आणि सन्मानपूर्वक जीवनाचा अधिकार दिला असून या हक्कांची अंमलबजावणी करणे हे आयोगाचे प्रमुख कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक, सामाजिक, बौद्धिक आणि शारीरिक या चार अंगांचा समतोल विकास आवश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. समाजात अद्याप बालमजुरी, बालविवाह, अत्याचार, शिक्षणापासून वंचितता आणि आरोग्याच्या समस्या असल्याने त्यावर ठोस उपाययोजना राबविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बालहक्क संरक्षण, शिक्षण व आरोग्य सुविधा सर्वांपर्यंत पोहोचविणे, बाल अत्याचाराविरोधात कठोर भूमिका, जनजागृती वाढविणे आणि तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर विशेष भर दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेचा उल्लेख करत त्यांनी बालकांचे योग्य संगोपन आणि संस्कार यावर भर दिला. शेवटी, सर्व विभाग, संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.

  • 1
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *