नंदुरबार

तळोदा महाविद्यालयात वार्षिक संमेलनाचे आयोजन

तळोदा महाविद्यालयात वार्षिक संमेलनाचे आयोजन

तळोदा|सप्त नगरी न्यूज ब्युरो येथील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध खेळ, कला व सांस्कृतिक कार्यक्रमात आपले गुण-कौशल्ये सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली.
                       कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमा-पूजनाने करण्यात आली. यावेळी काॅलेज ट्रस्टचे अध्यक्ष भरतभाई माळी प्रमुख अतिथी म्हणुन उपस्थित होते. उपाध्यक्ष रोहित माळी, सह-सचिव अरविंद माळी, मुकेश कलाल, यु.जी.पिंपरे, चेतन पवार, दत्तात्रय पाटील, एड.किरण बैसाणे, प्राचार्य डाॅ.हेमंत दलाल यांची विशेष उपस्थिती लाभली.
                        स्नेहसंमेलन दरम्यान विविध खेळांसोबतच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य, गायन यासह इतर ही कलाप्रकार सादर करण्यात आले. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. यावेळी परीक्षक म्हणुन अरूण कुवर, श्रीमती हंसा कलाल, कु.भूमिका बच्छाव उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात भरत माळी यांनी विद्यार्थ्यांच्या उपजत कला-गुणांचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी पुस्तकी ज्ञानासोबतच इतर कला-गुण आत्मसात करून विकास साधावा आणि महाविद्यालयाचा नावलौकिक वाढवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
                         प्रास्ताविक स्नेहसंमेलन प्रमुख प्रा.डाॅ.मुकेश जावरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डाॅ.जयपालसिंग शिंदे व प्रा.सुवर्णा गिरासे यांनी केले. स्नेहसंमेलन आयोजनात सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *