
धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील कृषि विद्यालयाचा संघ विद्यापीठस्तरीय खो-खो स्पर्धेत उपविजेता
तळोदा । सप्त नगरी न्यूज ब्युरो धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील कृषि विद्यालयातील कबड्डी मुले तृतीय, व्हॉलीबॉल मुली तृतीय, खो-खो मुली तृतीय तर खो-खो मुले संघाने विद्यापीठ स्तरीय खो-खो स्पर्धेत अंतिम सामन्यात उपविजेतेपद पटकावित घवघवीत यश संपादन केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच धुळे घटक कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य प्रा.आर.टी.सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे सन २०२५-२६ झालेल्या विद्यापीठस्तरीय क्रिडा स्पर्धेत धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील धुळे कृषि तंत्रज्ञान विद्यालयाच्या कबड्डी मुले तृतीय, व्हॉलीबॉल मुली तृतीय, खो-खो मुली तृतीय तर खो-खो मुले संघाने विद्यापीठ स्तरीय खो-खो स्पर्धेत अंतिम सामन्यात उपविजेतेपद पटकाविले. तर वैयक्तिक क्रिडा प्रकारात लांबउडी मुली प्रथम व द्वितीय, लांबउडी मुले प्रथम, उंचउडी मुली प्रथम, १०० मीटर धावणे मुली द्वितीय, १०० मीटर धावणे मुले तृतीय, २०० मीटर धावणे मुली प्रथम, २०० मीटर,धावणे मुले तृतीय, ४०० मीटर धावणे मुले द्वितीय असे घवघवीत यश संपादन केले.
दरम्यान दि.१२ व १३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे झालेल्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेत धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील कृषि तंत्र विद्यालयाच्या खो-खो मुले संघाने या स्पर्धेत अंतिम सामन्यात उपविजेतेपद पटकावित घवघवीत यश संपादन केले. यावेळी सर्व यशस्वी संघाचे व खेळाडूंचे धुळे घटक कृषि तंत्र विद्यालयाचे प्राचार्य प्रा.आर.टी.सुर्यवंशी, गोपाल सोनवणे, मनोज सोनवणे, संघ व्यवस्थापक प्रा.सुरेश वाघ, धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील कृषि विद्यालयाचे प्राचार्य, क्रिडा शिक्षक आदींसह रांझणी कृषि विद्यालयाचे अध्यक्ष कुमारपाल जैन, प्राचार्य प्रफुल्ल पाटील, प्रा.प्रविण वसावे, प्रा.शरद साठे, भिक्कन पाटील, राजेश पाडवी, संगिता वसावे, दिपक मराठे, जितेंद्र वानखेडे आदींनी कौतुक करून अभिनंदन केले.
- 0
- 0
- 0
- 0





