
शिवजी हे जीवन आणि मृत्यू या दोन्हींच्या पलीकडे पाहणारे महादेव -ह भ प मच्छिंद्र महाराज कोकणे
नाशिक |सप्त नगरी न्यूज ब्युरो शिवजी हे जीवन आणि मृत्यू या दोन्हींच्या पलीकडे पाहणारे महादेव आहेत असे ह भ प मच्छिंद्र महाराज कोकणे यांनी आपल्या कीर्तनात विशद केले.

इगतपुरी तालुक्यातील भरविर बुद्रुक येथील श्री महेश्वर महादेव मंदिराच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते.जीवन आणि मृत्यू यांच्यातील अंतिम सत्य नश्वरता आणि वैराग्य दर्शविण्यासाठी समशानातील राख शिवजी अंगावर लावतात आणि ध्यान करतात. त्यामुळे ते जीवन आणि मृत्यू या दोन्हींच्या पलीकडे पाहणारे महादेव आहेत असे ते म्हणाले.

यावेळी भरविर बुद्रुकसह परिसरातील ग्रामस्थांनी कीर्तन सोहळाचा लाभ घेतला.दिवसभरातून राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच नाशिक जिल्हाभरातून भाविकांनी दर्शन घेतले.कीर्तन सोहळानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी समस्त ग्रामस्थ , भजनी मंडळ ,युवक मंडळ भरविर बुद्रुक यांनी मेहनत घेतली.
- 0
- 0
- 0
- 0





