कोल्हापूर

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांशी साधला जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकाऱ्यांशी साधला जिल्हाधिकाऱ्यांनी संवाद

कोल्हापूर दि : 13 (जिमाका) मसूरी येथील ट्रेनिंग अकॅडमीमध्ये प्रशिक्षणार्थी आयएएस म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या सन 2025 च्या वर्षातील बॅचच्या प्रशिक्षणार्थींनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागांना भेट देत तेथील महसूली कामकाजा विषयक माहिती घेतली. या प्रशिक्षणार्थींशी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी त्यांच्या दालनात संवाद साधला.

   कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार चळवळ अतिशय समृद्ध व सुस्थितीत असून या चळवळीचा जरूर मागोवा घ्या, अशी सूचना यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशिक्षणार्थींना केली.

     हे भारतीय प्रशासकीय सेवेतील प्रशिक्षणार्थी 15 फेब्रुवारी पर्यंत जिल्ह्यात राहणार असून जिल्ह्यातील विविध उद्योग समूह, शासकीय कार्यालये, ऐतिहासिक स्थळे या ठिकाणी समूहाने भेट देवून तेथील कार्यशैली समजावून घेणार आहेत.

याप्रसंगी प्रशिक्षणार्थींनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना मसुरी येथील ट्रेनिंग सेंटरची प्रतिमा भेट म्हणून दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, मनपा उपायुक्त पारितोष कंकाल आदी उपस्थित होते .

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *