नंदुरबार

तळोदा श्री.बडादादा फाउंडेशन व श्री.बडादादा गणपती नवयुवक मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने घातक नायलॉन मांजा’ची होळीपर्यावरण रक्षणाचा संदेश.

तळोदा श्री.बडादादा फाउंडेशन व श्री.बडादादा गणपती नवयुवक मंडळ, यांच्या संयुक्त विद्यमाने घातक नायलॉन मांजा’ची होळी
पर्यावरण रक्षणाचा संदेश.

तळोदा |सप्त नगरी न्युज ब्युरो

मकर संक्रांतीचा सण जवळ येत असताना तळोदा शहरात पतंगबाजीचा उत्साह वाढत आहे. मात्र, पक्षी आणि मानवांसाठी जीवघेणा ठरणारा नायलॉन मांजा वापरू नये, असा संदेश देण्यासाठी आज श्री. बडादादा फाउंडेशन सदस्य यांनी नायलॉन मांजाची होळी करून अनोखे आंदोलन केले.
    

                           गेल्या काही वर्षांत नायलॉन मांजामुळे अनेक दुचाकीस्वारांचे गळे कापले गेल्याच्या आणि शेकडो पक्षी जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.प्रशासनाने या मांजावर बंदी घातली असली आहे.या पार्श्वभूमीवर, बडा फाउंडेशन आणि गल्लीतील तरुणांनी एकत्र येऊन स्वतःजवळील आणि परिसरातून नायलॉन मांजा एका ठिकाणी जमा केला आणि त्याची होळी केली.

      

                         या संकल्पनेत गल्लीतील जेष्ठ भिकाभाऊ गुरव, सूरज भाऊ शिंपी, आणि बडादादा फाउंडेशन चे सदस्य रोहन कलाल,नयन पाटील,विनीत मोराणकर, कोहिनूर दातीर, स्वामी पाटील, निखिल गुरव, पवन गुरव ,संकेत पाटील, राजेश गुरव, रितेश देडगे, ललित पाटील, वैभव वंजारी,दर्शन गुरव,गौरव गुरव, ओम गुरव, ,मोनू गुरव, टीनू गुरव , मिलींद गुरव, गणेश कलाल ,भाविन पाटील, लाला पाटील, दर्शन दातीर इत्यादी सदस्य उपस्थित होते.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *