
तळोदा येथे मराठा समाजाकडून राजमाता जिजाऊ जयंती साजरा…
वयोवृद्ध मातापित्यांसोबत राहत असलेल्या संयुक्त कुटुंबाचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान…

तळोदा | सप्त नगरी न्युज ब्युरो
तळोदा येथे मराठा समाजाच्या वतीने आदर्श मातृत्वाचे प्रतिक, छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती निमित्त मराठा समाज परिवर्तन चळवळ, मराठा समाज प्रबोधन मंडळ, मराठा समाज महिला परिवर्तन चळवळ, मराठा समाज युवा परिवर्तन चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक मिरवणूक काढून शहरातील माळी समाज मंगल कार्यालय येथे विविध उपक्रमातून राजमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस मराठा समाजाकडून सकाळी ए.बी.सर्कल पासून ते माळी समाज मंगल कार्यालय पर्यंत सांस्कृतिक मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमास तळोदा नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी, श्यामभाऊ जाधव, कुकरमुंडाचे उपसरपंच भास्करराव कदमबांडे, सेलंबाचे व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ईश्वर पवार, विश्वासराव मराठे, धनराज घेवारे, धुळे श्री संस्कार अनाथ व मतिमंद मुलींचे बालगृहाचे प्रमुख ह.भ.प.सुनिल वाघ, गुलाब मराठे, एन.डी.पाटील, जयश्री चौधरी, भावना कदम, ज्योती कदम, मराठा समाज महिला परिवर्तन चळवळीच्या अध्यक्षा ताराताई मराठे, संगिता मराठे, भारती कदम, रंजना पवार, हेमा रावडे, कल्पना जगदाळे, सविता कदम आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात तळोदा येथील नवनिर्वाचित नगराध्यक्षा भाग्यश्रीताई चौधरी, नगरसेविका शितल पाडवी, जयश्री महाले, प्रतिभा पाडवी, हर्षा पाडवी, गायत्री पिंपरे, लक्ष्मी नाईक, नगरसेवक कल्पेश चौधरी, अरविंद प्रधान तसेच जिल्ह्यातील मराठा समाजातील नवनियुक्त नगरसेवक रवि पवार नंदुरबार, सागर बोराणे शहादा आदींना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा समाज परिवर्तन चळवळ व प्रबोधन मंडळाचे मुख्य समन्वयक विठ्ठल मराठे यांनी केले. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा ताराबाई मराठे, सुनिल वाघ, सुभद्राताई मराठे, सारिका आव्हाळे आदींनी राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.

मराठा समाजाला वसतीगृहासाठी जागेचे दान केलेल्या योगेश मोतीराम झिने यांचा सत्कार व जागेचे लोकार्पण करण्यात आले. तर आपल्या कुटुंबासाठी वयोवृद्ध मातापित्यांचा सांभाळ करत त्यांची सेवा करणाऱ्या संयुक्त कुटुंबाचा उल्लेखनीय, प्रेरणादायी कार्याची दखल घेऊन अशा एकत्र कुटुंबाच्या सदस्यांना मंडळाच्या वतीने राजमाता जिजाऊ जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनराज पाचोरे, राजेंद्र कूटे यांनी केले. तर आभार नंदराव कोते यांनी मानले. या कार्यक्रमाला परिसरातून मराठा बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठा समाज परिवर्तन चळवळ, मराठा समाज प्रबोधन मंडळ, मराठा समाज महिला परिवर्तन चळवळ, मराठा समाज युवा परिवर्तन चळवळीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
रॅलीने वेधले शहराचे लक्ष
एबी सर्कलपासून गुलाबी थंडीत निघालेल्या समाजबांधवांच्या रॅलीने शहरवासीयांचे लक्ष वेधले. स्मारक चौकात रॅली आली असता सर्व समाजबांधवानी व्यसनमुक्तीची शपथ घेतली.
- 0
- 0
- 0
- 0





