नाशिक

नाशिकच्या कॉलेजरोडवर आगडोंब; पाच दुकाने बेचिराख, कोणतीही जीवितहानी नाही

नाशिक : कॉलेज रोडवरील बीवायके महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर असलेल्या छोटू वडापावच्या दुकानात बुधवारी (दि. १०) रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास अचानकपणे आगीचा भडका झाला क्षणार्धात आगीने रौद्रावतार धारण केला. आगीच्या ज्वाला इमारतीच्या पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचल्याने चार ते पाच दुकानांना हानी पोहचली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परता दाखवून घटनास्थळी दाखल होत शर्थीचे प्रयत्न करून अवघ्या वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. कॉलेज […]

कोल्हापूर

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवण्याचा मेल तपास पथक श्वानासह तपास पथक दाखल

कोल्हापूर :  येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बॉम्ब ठेवला असून दुपारी दोन वाजेपर्यंत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावे असा मेल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या अकाउंट वर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. तातडीने बॉम्ब शोध पथक आणि श्वानपथक दाखल झाले असून पोलीस आणि कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवानही दाखल झालेले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयांच्या दालना समोरून सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात आले असून या ठिकाणी प्रत्येक कक्षाची, […]

अहिल्यानगर

शैनेश्वर देवस्थान बनावट ॲप प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक

अहिल्यानगर –  शनेश्वर देवस्थान ट्रस्ट येथील बनावट ॲप प्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना सायबर पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिराने अटक केली. सचिन अशोक शेटे व संजय तुळशीराम पवार , असे अटक केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. शैनेश्वर देवस्थान मध्ये बनावट ॲप तयार करून भाविकांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाची सायबर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या […]