दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार राजेश पाडवी
टवळाई, आंबापूर, श्रीखेड शिवारात पिकांची पाहणी; नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तत्काळ सादर करण्याच्या सूचना

शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघातील दुष्काळसदृश परिस्थितीची दखल घेत आमदार राजेश पाडवी यांनी शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. शहादा तालुक्यातील टवळाई, आंबापूर आणि श्रीखेड शिवारात भेट देत त्यांनी पावसाअभावी झालेल्या पिकांच्या नुकसानीचा आढावा घेतला.

यावेळी आमदार पाडवी यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व व्यथा जाणून घेतल्या. पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तत्काळ सादर करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या.
पाहणीदरम्यान कृषी अधिकारी, तहसीलदार तसेच भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा विश्वास आमदार राजेश पाडवी यांनी यावेळी व्यक्त केला.

- 0
- 0
- 0
- 0





