नंदुरबार

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची ग्रामीण रुग्णालय, मोलगी येथे भेट

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची ग्रामीण रुग्णालय, मोलगी येथे भेट

नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी दि.१६ जुलै २०२६ रोजी ग्रामीण रुग्णालय, मोलगी येथे भेट देऊन रुग्णालयातील आरोग्य सेवा व पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
Selco Foundation तर्फे उपलब्ध करून देण्यात आलेली सौर ऊर्जा प्रणाली, वैद्यकीय उपकरणे व इतर दर्जेदार सुविधा वेळेत कार्यान्वित केल्याबद्दल संस्थेचे कौतुक करण्यात आले.


रुग्णालयात रक्त साठवणूक केंद्र लवकर सुरू करण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करणे बाबत निर्देश देण्यात आले.
सध्या ३० खाटांचे असलेल्या रुग्णालयाचे ५० खाटांच्या रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचे बांधकाम तात्काळ पूर्ण करण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदारांना निर्देश देण्यात आले.


रुग्णालयातील जुनी विद्युत यंत्रणा बदलून आधुनिक विद्युत मीटर पॅनेल, दर्जेदार विद्युत जोडणी व पुरेशी प्रकाश व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले.
विस्कळीत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नादुरुस्त बोअरवेल व जुन्या पाइपलाइनची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
BSNL दूरसंचार सेवा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रुग्णालय परिसरातील स्वच्छता अधिक प्रभावीपणे राखण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढविण्याबाबत निर्देश देण्यात आले.
ग्रामीण भागातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मोलगी ग्रामीण रुग्णालयातील सुविधांच्या बळकटीकरणावर प्रशासनाकडून विशेष भर देण्यात येत आहे.

  • 0
  • 0
  • 0
  • 0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *