
शेजवा शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
नंदुरबार : सप्त नगरी न्यूज ब्युरो:- नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित बाळासाहेब ठाकरे माध्यमिक विद्यालय शेजवा शाळेत प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा सन 2026-27 च्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शेजवा गावाचे माजी सरपंच विजयसिंग वसावे, तंटामुक्तीचे अध्यक्ष तापसिंग वसावे , दयानंद वसावे यादी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेत इयत्ता 5 वी मध्ये नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे ट्रॅक्टर ट्रॉलीत बसवून वाजत गाजत शेजवा गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शाळेतील इयत्ता 6 वी ते 10 वीचे विद्यार्थी मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते

यावेळी विद्यार्थ्यांनी विविध घोषणा दिल्या. त्यानंतर मिरवणूक शाळेच्या आवारात आल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर इयत्ता 5 वी ते 8 वी च्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक व मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी 2025 26 मध्ये शाळेत दररोज शाळेला उपस्थित राहणारे व शैक्षणिक गुणवत्तेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक दत्तू पाटील यांच्याकडून शाळेचा गणवेश वाटप करण्यात आला.

यावेळी पर्यावरण संवर्धना विषयी उपस्थित विद्यार्थी मुख्याध्यापक, शिक्षक व मान्यवर यांनी शपथ घेऊन. शाळेच्या आवारात मान्यवरांच्या हस्ते वडाचे वृक्ष लावण्यात आले. यावेळी अध्यक्ष भाषणातून मुख्याध्यापक पाटील यांनी विद्यार्थ्यांना दररोज शाळेत येण्या विषयी व अभ्यासाविषयी मार्गदर्शन केले मध्यान्ह भोजन म्हणून विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिष्टान गोड जेवण देण्यात आले.

सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे क्रीडाशिक्षक विजय पवार यांनी केले तर आभार कलाशिक्षक आनंदराव पवार यांनी केले सदरील कार्यक्रमाला शाळेचे उपशिक्षक दिपक वळवी, रामानंद बागले, हरूणखाॅ शिकलीकर,संजय बोरसे, संदीप गायकवाड, श्रीमती संगीता गोखले, कनिष्ठ लिपिक श्रीमती नेहा शर्मा यादी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे शिपाई संजय वसावे दिनेश पवार यांनी परिश्रम घेतले शाळेची सुट्टी वंदेमातरम् गीता ने झाली
- 0
- 0
- 0
- 0





